Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : तीन साखर कारखाने बंद

गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उतारा अद्यापही कमी आहे. राज्याने दहा टक्के साखर उताराही ओलांडलेला नाही.

Raj Chougule

Kolhapur News : राज्यातील ऊस गळीत हंगामाच्या (Sugarcane Crushing) अंतिम टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. शनिवार (ता. १२) अखेर ३ साखर कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दोन, तर पुणे जिल्ह्यातील एक कारखाना बंद (Sugar Factory) झाला आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उतारा अद्यापही कमी आहे. राज्याने दहा टक्के साखर उताराही ओलांडलेला नाही. गेल्या हंगामात या कालावधीत १०.१४ टक्क्यांपर्यंत साखर उतारा होता.

या हंगामात ९.८० टक्क्यांपर्यंत साखर उतारा जात आहे. हंगाम अंतिम टप्प्यात येत असतानाही कमी साखर उताऱ्याची समस्या भेडसावत आहे.

राज्यात ऊसतोडणी गतीने सुरू झाली असली, तरी साखर उताऱ्यात घट असल्याने फारसे उत्साहवर्धक चित्र नाही. कोल्हापूर विभाग सर्वाधिक ११.२ टक्के साखर उताऱ्याने राज्यात आघाडीवर आहे.

या खालोखाल नांदेड विभागाने ९.८५ टक्के उतारा मिळवत द्वितीय स्थान मिळवले आहे. नागपूर विभागाचा उतारा सर्वात कमी म्हणजे ८.८७ टक्के आहे.

अंदाज चुकू लागले

गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखर उत्पादन जास्त होण्याचा अंदाज हंगाम सुरू होण्याअगोदर व्यक्त करण्यात आला होता. देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन होईल, अशी अटकळ होती.

अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र साखरेच्या उत्पादनात अग्रेसर असला, तरी एकरी उत्पादन घटत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

११ फेब्रुवारीअखेर गाळपाची स्थिती

विभाग-गाळप (लाख टन)-साखर उत्पादन (लाख क्विंटल)

कोल्हापूर-१९२-२१७

पुणे-१७४-१७१

सोलापूर-१९६-१७७

नगर-१०५-९९

औरंगाबाद-७७-७०

नांदेड-७९-७८

अमरावती-६-६

नागपूर-४-३

एकूण-८३५-८२०

ऊसवाढीच्या काळात म्हणजे प्रामुख्याने पाच ते दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. कुठेही वाफशाची स्थिती नव्हती. केवळ पाऊसच झाला नाही, तर सातत्याने प्रकाशाचा अभाव राहिला. याचा नकारात्मक परिणाम उसाच्या वाढीवर झाला. ऊस पीक दिसायला चांगले दिसत असले, तरी प्रत्यक्षात तोडणी वेळी मात्र प्रत्येक शेतकऱ्याला ही घट दिसून येत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय कोल्हापूर
प्रगतिशील शेतकऱ्यांकडे चांगले व्यवस्थापन करून सुद्धा एकरी पाच टनांपर्यंतची घट दिसून येत आहे. मध्यंतरीच्या काळात ज्या वेळी उसाला अन्नद्रव्याची गरज होती, त्या वेळी पुरेशी अन्नद्रव्ये न मिळाल्याने ऊस उत्पादन घटले. याचा फटका शेतकऱ्यांना तर बसला आहेच, पण कारखान्याचे गाळप कमी क्षमतेने होत असल्याने यंदाचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे.
दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी, दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीच्या मदतीवरुन घुमजाव, राज्याने केंद्राला प्रस्ताव दोन महिने उशिरा पाठवला, मोठा खुलासा

Rice Market: दर्जेदार तांदळाला बाजारपेठेत चांगली मागणी

Soybean Crisis: मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांचे २९२ कोटींचे नुकसान

Kapas Kisan App: क्लिष्ट ‘कपास किसान अ‍ॅप’; शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप

Local Body Elections: कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकांसाठी चुरशीने मतदान

SCROLL FOR NEXT