Kranti Sugar Factory : क्रांती साखर कारखाना ठरला सर्वोत्कृष्ट

क्रांती कारखान्याचा देश पातळीवरील हा पुरस्कार २०२१-२२ सालात उच्च साखर उतारा विभागात कारखान्याने केलेले कार्यक्षमरीत्या तांत्रिक कार्य, काटेकोर आर्थिक नियोजन आणि ऊस विकासात केलेल्या भरीव कामामुळे देण्यात आला.
Sugar Factory
Sugar Factory Agrowon

कुंडल, जि. सांगली ः येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला (Dr. G. D. Bapu Lad Cooperative Sugar Factory) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली यांचा देशातील ‘सर्वोकृष्ट सहकारी साखर कारखाना’ पुरस्कार (Best Cooperative Sugar Factory Award) मिळाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute Pune) पुणे येथे कारखान्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार आमदार अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), सतेज पाटील (Satej Patil), बबनराव शिंदे, दिलीप वळसे-पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुणअण्णा लाड, उपाध्यक्ष उमेश जोशी, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे आणि संचालक मंडळाने स्वीकारला.

Sugar Factory
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर ‘प्राप्तिकर’चा छापा

क्रांती कारखान्याचा देश पातळीवरील हा पुरस्कार २०२१-२२ सालात उच्च साखर उतारा विभागात कारखान्याने केलेले कार्यक्षमरीत्या तांत्रिक कार्य, काटेकोर आर्थिक नियोजन आणि ऊस विकासात केलेल्या भरीव कामामुळे देण्यात आला. कारखान्याने साखरेची गुणवत्ता चांगली ठेवली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com