Sugar Factory Election : गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत शिवशाही पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या २० जणांच्या संचालक मंडळासाठी रविवारी (ता. १२) मतदान प्रक्रिया पार पडली होती.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Aurangabad Sugar Factory Election : जिल्ह्यातील गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत (Gangapur Cooperative Sugar Factory Election) आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bomb) यांच्या पॅनेलचा पराभव, तर कृष्णापाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने एकहाती विजय मिळवला.

गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या २० जणांच्या संचालक मंडळासाठी रविवारी (ता. १२) मतदान प्रक्रिया पार पडली होती. सोमवारी (ता. १३) मतमोजणी झाली.

एकूण १४ हजार ६६ मतदार सभासदांपैकी ७ हजार ५९८ जणांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. मतदारांमध्ये निरुत्साह होता. केवळ ५४ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कोणीकडे याची उत्सुकता होती. अखेर मतमोजणीअंती कारखान्याचे माजी अध्यक्ष कृष्णापाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही पॅनेलचे सर्वच्या सर्व २० उमेदवार विजयी झाले.

आमदार बंब यांच्यासह त्यांचे संपूर्ण पॅनेल पराभूत झाले. आमदार बंब यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Sugar Factory
Sugar Factory : शिरपूर साखर कारखाना सुरू होणार

कृष्णापाटील डोणगावकर हे कारखान्याचे माजी अध्यक्ष असल्याने त्यांनी ही निवडणूक आपल्या अनुभवाच्या जोरावर योग्य पद्धतीने हाताळल्याचे पाहायला मिळाले.

सभासद मतदारांना विश्‍वासात घेत कारखाना सुरू करण्याच्या त्यांच्या आश्‍वासनावर मतदारांनी विश्‍वास दाखवला.

आमदार बंब यांच्या अध्यक्षतेखाली गेली पाच वर्ष कारखान्यावर सत्ता असलेल्या संचालक मंडळाला मात्र सभासदांनी घरचा रस्ता दाखवला. दोन फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत पहिल्यापासूनच शिवशाही पॅनेल आघाडीवर होते.

पहिल्या फेरीत ५७१ मतांची आघाडी दुसऱ्या फेरीत दुप्पट झाली आणि तिथेच बंब आणि पॅनेलच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले होते. कृष्णापाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनेलची आघाडी मतमोजणी संपेपर्यंत कायम राहिली.

अंबेलोहळ, पुरी, लासूर, तुर्काबाद, कायगावसह सर्वच गटांत बंब यांच्या पॅनेलला शिवशाहीच्या उमेदवारांनी धूळ चारली. लासूर स्टेशन गटातून कृष्णा पाटील डोणगावकर यांनी आमदार प्रशांत बंब यांचा पराभव केला.

माजी नगराध्यक्ष संजय जाधव आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. शिवशाही विकास पॅनेलचा विजय झाल्यानंतर समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com