Rajankar Family Agrowon
ॲग्रो विशेष

Success Story: शेतकरी कुटुंबातील तीन भावंडे बनली ‘ एमबीबीएस’

Inspiring Journey: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील तीन भावंडांनी एकाच वेळी एमबीबीएस पदवी संपादन केली असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि प्रेरणा पसरली आहे.

 गोपाल हागे

Buldana News: मेहनत, चिकाटी आणि एकमेकांना दिलेली साथ यामुळे मिळणारे उल्लेखनीय यश याचे उत्तम उदाहरण संग्रामपूर येथील राजनकर कुटुंबाने घालून दिले आहे. राजनकर या सामान्य शेतकरी कुटुंबातील प्राची, प्रतीक आणि दीपक या तीन भावंडांनी यंदा एमबीबीएसची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

एका सामान्य शेतकरी कुटुंबातील ही तीन भावंडे डॉक्टर झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. संग्रामपूरसारख्या ठिकाणी उच्च शिक्षणाची सोय नसताना आई-वडिलांनी पुढाकार घेतला. त्यात कौटुंबिक किंवा अन्य अडचणींवर मात करत आपल्या मुलांच्या शिक्षणात कधीही कुचराई होऊ दिली नाही. मुलांनीही त्यांच्या कष्टाचे भान ठेवत यशाचे शिखर गाठले.

प्राची आणि प्रतीक यांची डॉक्टरीची वाटचाल थोडी आधी सुरू झाली, तर लहान दीपक यानेही आपली मेहनत सतत सुरू ठेवत यश संपादन केले. तिघांचेही एकच स्वप्न होते ते म्हणजे, डॉक्टर होऊन समाजासाठी काहीतरी करायचे आणि हीच जिद्द त्यांना त्यांच्या यशापर्यंत घेऊन आली. या तिघांच्या यशामुळे संपूर्ण गावात आणि नातेवाइकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत असून, राजनकर कुटुंब आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहे.

वडील सुरेश राजनकर यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. तीन भावांचे मोठे कुटुंब असताना एकत्रित विचारधारा ठेवून शेतीला व्यावसायिक बनवत कष्ट करण्याची तिघा भावांची अपार तयारी आहे. एकत्र असतानाही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची जबाबदारी सर्वांनीच घेतली. शेतीशिवाय दुसरा आर्थिक स्रोत नसल्याने एकीच्या बळावर मुलांच्या शिक्षणावर भर देता आला आणि शेतकरी कुटुंबातील आमची मुले या सचोटीत खरी उतरली, याचा आम्हा सर्व कुटुंबीयांना अभिमान असल्याचे सुरेश राजनकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

Water Management: आधुनिक तंत्रज्ञानाने जल व्यवस्थापनातील समस्येची उकल शक्य

El Nino Impact Agriculture: यंदा एल निनोचे सावट; भूजल पुर्भरण गरजेचे!

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

SCROLL FOR NEXT