Chana Pest Control Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Pest Control : हरभऱ्यातील घाटेअळीला रोखण्याचे तीन उपाय

Team Agrowon

Chana Pod Borear : सध्या बऱ्याच ठिकाणी हरभरा पेरणीची लगबग सुरु आहे. हरभरा लागवडीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. ही घाटे अळी हरभरा पिकावर आपले २ जीवनक्रम पूर्ण करते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत.

या घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच घाटे अळी पासून हरभरा पिकाचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केले तर होणार नुकसान टाळता येत.

उपाय १

हरभरा पीक घाटे लागण्याच्या अवस्थेत असताना प्रामुख्याने घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.  सुप्तावस्थेतून बाहेर पडून घाटे अळीचा पतंग शेतात अंडी घालतो तेंव्हापासूनच घाटेअळीचा प्रादुर्भाव सुरु होतो.  त्यामुळे सुरुवातीला या पतंगाला रोखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील.

यासाठी काय करायच? तर पहिला उपाय आहे हरभऱ्याचे पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी पिकाच्या उंचीपेक्षा ४ ते ५ फूट पेक्षा जास्त उंचीचे एकरी साधारणत: १२-१५ पक्षिथांबे शेतात उभारावेत. यासाठी साडेपाच फूट ते ६ फूट लांबीच्या काठीला एका बाजूने टोक करावे. म्हणजे ते जमिनीत एक फुटापर्यंत चांगले खुपसता येते. त्यावर दीड ते २ फूट लांबीची काठी आडवी पक्की बांधावी. त्यावर पक्षी बसून शेतातील घाटे अळी व त्याच्या पतंगाचा फडशा पाडतात.

उपाय २ 

दुसऱा उपाय आहे पीक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी साधारणत: ७ ते १० दिवस आधी शेतात कामगंध सापळे लावावेत. यामध्ये घाटे अळीचा हेलील्युअर लावावा. ल्युअर खाचेमध्ये लावताना त्याला बोटाने स्पर्श न करता पाऊच फोडून ल्युअरचा नरम भाग अंगठा व पहिल्या दोन बोटांच्या चिमटीत पकडून खाचेत लावावा. खाली पाऊचसुद्धा कामगंध सापळ्याच्या प्लॅस्टिक बॅगेमध्ये टाकावा.

उपाय ३

तीसरा उपाय आहे पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी ७ ते १० दिवस आधी हरभरा पिकावर निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन १५०० पीपीएम ५० मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ही फवारणी केल्यामुळे घाटेअळीचा पतंग शेतात अंडी घालण्यासाठी येत नाही. घाट्यामध्ये दाणे भरत असताना  इमामेक्टीन बेन्झोएट हे कीडनाशक ४ ते ६ ग्रॅम किंवा हे कीडनाशक मिळत नसेल तर क्लोरॲन्ट्रानिलीपोल हे कीडनाशक २.५ ते ३ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खरगे पडणे

काही वेळा हरभऱ्याचे घाटे पक्व होताना पिकात खरगे पडतात.  हरभऱ्याचे पीक घाटे अवस्थेत असताना ठराविक भागातील झाडे अचानकपणे कोमेजून सुकायला लागतात. यालाच शेतकरी ‘खरगे पडले’असे म्हणतात. ही समस्या मुळसड या रोगामुळे होते. हा रोग  बुरशीमुळे होतो.  

या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा  कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम हे बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारचं आहे. लक्षात ठेवा यापैकी जे उपलब्ध असेल त्या बुरशीनाशकाचीच फवारणी करायची आहे.  हे घटक घाटेअळीच्या नियंत्रणासाठी करायच्या प्रत्येक फवारणीसोबत वापरता येतात.  

-----------

माहिती आणि संशोधन - जितेंद्र दुर्गे, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT