Agriculture Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Waive : तीनशे कोटींचे वीजबिल माफ

Agriculture Electricity : 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४'' नुसार ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nagar News : ''मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४'' नुसार ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीजपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ४ लाख १ हजार ६७५ शेतीपंप आहेत. त्यापैकी ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या ३ लाख ७८ हजार ८६६ शेतीपंपधारक शेतकऱ्यांना या मोफत वीज योजनेचा लाभ होणार आहे.

जून २०२४ च्या वीज देयकानुसार त्यांना २९७ कोटी रुपयांचे वीजबिल भरावे लागणार नाही, अशी माहिती महावितरण अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी दिली. जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींचा सामना सातत्याने करावा लागत आहे. त्यातच शेतकऱ्यांना वेळेवर वीज उपलब्ध झाली नाही, तर सिंचनासाठी समस्या निर्माण होतात.

अशावेळी शेतकरी वर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील ७.५ एच. पी. पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी ''मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना - २०२४'' राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महावितरणच्या एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषिपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३० टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ दश लक्ष युनिट आहेत. प्रामुख्याने या विजेचा वापर कृषिपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो.

सद्यःस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना रात्रीच्या काळात ८ ते १० तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.

महावितरण कंपनीला अग्रीम स्वरूपात वर्ग

‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येईल. शासनास विद्युत अधिनियम २००३, कलम ६५ अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानीत वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीजबिल माफ केल्यानंतर सदर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरूपात वर्ग करण्यात येणार आहेत.

तीन वर्षांनी आढावा

ही योजना पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. मात्र, तीन वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊनच पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील ७.५ एच. पी. पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT