Transit Treatment Center Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Rescue : वाघासह हजारो वन्यजीव अधिवासात मुक्त

Team Agrowon

Nagpur News : वन्यजीवांच्या अपघातानंतर त्वरित उपचार, बचाव आणि संगोपनासाठी उभारण्यात आलेल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये मार्च २०२२ ते नोव्हेंबरपर्यंत २०२३ या कालावधीत २२५० वन्यप्राण्यांसह पक्ष्यांना रेस्क्यू केले आहे. यावरूनच हे केंद्र वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

वाढते शहरीकरण, औद्योगीकरण आणि त्यातून होणारा निसर्गाचा ऱ्हास या सर्व गोष्टींचा फटका वन्यप्राण्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. मानव-वन्यजीव संघर्षही वाढतो आहे. त्यातून ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर ही संकल्पना पुढे आली. भारतात पहिल्यांदा २०१५ साली हे सेंटर नागपुरात अस्तित्वात आले. या संकल्पनेला मूर्त रूप सेमिनरी हिल्स येथे प्राप्त झाले.

या सेंटर मागील मूळ संकल्पना अपघात किंवा अन्य कारणांनी जखमी झालेल्या वन्य प्राण्यांचा बचाव करणे, उपचार करणे आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडणे अशी आहे, त्यानुसार ते काम करीत आहे. गेल्या आठ वर्षांत ७७६० वन्यप्राणी आणि पक्षी रेस्क्यू केले. त्यातील ५१४१ प्राणी वाचविण्यास यश आले असून २६१९ वन्यप्राणी उपचारादरम्यान मरण पावले.

ट्रीटमेंट ट्रान्झिट सेंटर हे आता बदलत्या परिस्थितीनुसार गरजेचे झालेले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष वाढलेले असताना हे सेंटर आदर्श ठरू लागले आहे. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा अधिक वन्यप्राण्यांसह पक्ष्यांनाही निसर्गाच्या सान्निध्यात सोडले आहे. राज्यात असे केंद्र व्हावे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे.
- डॉ. भरतसिंह हाडा, उपवनसंरक्षक
ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची कामगिरी आणि गरज लक्षात घेता राज्य सरकार राज्यातील ११ नवीन सेंटरला मान्यता दिली व काम सुरू झाले. महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त राजस्थानात दोन व कर्नाटक राज्यात तीन सेंटर उभारण्यात येत आहे. ही संकल्पना समजून घेण्यासाठी इतरही देशासह विदेशातील वन्यजीव अभ्यासक व प्रेमी सेंटरला भेट देत असतात.
- कुंदन हाते, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

वर्ष रेस्क्यू केलेले प्राणी अधिवासात सोडलेले मृत

२०१५-१६ १११ ४१ ७०

२०१६-१७ २९१ १४९ १४२

२०१७-१८ ३८४ १७८ २०६

२०१८-१९ ३५४ १३८ २१६

२०१९-२० ८९० ६२० २७०

२०२०-२०२१ १६६० १०५३ ६०७

२०२१-२०२२ १८२० ११०२ ७००

२०२२-२०२३ २२५० १८६० ३९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT