Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड तसेच खानदेशातील नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांतील १७ कारखान्यांनी आतापर्यंत ऊस गाळपाला सुरुवात केली आहे. गाळपात सहभागी झालेल्या १७ कारखान्यांमध्ये १० सहकारी तर ७ खासगी कारखान्याचा समावेश आहे. यंदा उस गाळपासाठी पाचही जिल्ह्यातील सुमारे २६ कारखान्यांनी प्रस्ताव दाखल केले हे विशेष..प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याने आतापर्यंत ऊस गाळपात सहभाग नोंदविला. नंदुरबार जिल्ह्यातील एका कारखान्याने ९१४३० टन उसाचे गाळप करत ४.९६ टक्के साखर उताऱ्याने ४३ हजार ३९० क्विंटल साखर उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील एका कारखान्याने २८ हजार २०५ टन उसाचे गाळप करत ६.९२ टक्के साखर उताऱ्याने १७५२५ क्विंटल साखर उत्पादन केले. .Sugarcane Crushing: सोलापुरात आतापर्यंत १४ लाख टन उसाचे गाळप.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार कारखान्यांनी २ लाख ७७ हजार ८८८ टन उसाचे गाळप करत ७.९ टक्के साखर उताऱ्याने २ लाख १९ हजार ६४० क्विंटल साखर उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी आतापर्यंत गाळपात सहभाग घेतला. या कारखान्यांनी २ लाख ८८ हजार ८०० टन उसाचे गाळप करत सरासरी ६.०५ टक्के साखर उताऱ्यांने १ लाख ७१ हजार ११५ क्विंटल साखर उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी ७ लाख २१ हजार ८९९ टन ऊस गाळप करताना सरासरी ५.६८ टक्के साखर कारखाने ४ लाख ९ हजार ९०५ क्विंटल साखर उत्पादन केले. .Sugarcane Crushing Season: एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवा.आजवर झालेल्या गाळपात पाचही जिल्ह्यांतील दहा सहकारी साखर कारखान्यांनी सहा लाख ३६ हजार ६९९ टन उसाचे गाळप करत सरासरी ५.८७ टक्के साखर उतारा राखत तीन लाख ७३ हजार ५९५ क्विंटल साखर उत्पादन केले. तर खासगी ७ कारखान्यांनी ७ लाख ६५ हजार ५२२ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.३७ टक्के साखर उताऱ्याने चार लाख ८७ हजार ९८० क्विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली..२६ कारखान्यांचे प्रस्ताव, २४ ना परवानाछत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील २६ कारखान्यांनी आतापर्यंत ऊस गाळपासाठी परवाना मिळण्याकरता प्रस्ताव दाखल केला. त्यापैकी २४ कारखान्यांना परवाना देण्यात आला. गत वर्षी या पाचही जिल्ह्यांत सुमारे २२ कारखाने ऊस गाळप करत होते. यंदा गाळप परवाना मिळालेल्या कारखाण्यापैकी आतापर्यंत १७ कारखाने प्रत्यक्षात गाळप सुरू करू शकले. एका कारखान्याचा प्रस्ताव अजून प्रक्रियेत असून एका कारखान्याचा प्रस्ताव भरणा बाकी असल्याने नाकारण्यात आल्याचे साखर विभागाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.