Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा व एका नगरपंचायतसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या शर्यतीतून अध्यक्षपदासाठीच्या १२ तर सदस्यपदासाठीच्या १४९ जणांनी माघार घेतली. शुक्रवारी (ता. २१) दुपारी तीनपर्यंतच्या अर्ज माघारीच्या मुदतीनंतर अध्यक्षपदासाठी ४२ तर सदस्यपदासाठी ६१७ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत..अधिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद या नगर परिषदांसाठी तर फुलंब्री या नगरपंचायतसाठी अध्यक्षपदाकरिता एकूण ५४ तर सदस्यपदाकरिता ७६६ जणांचे अर्ज छाननीनंतर वैध ठरले होते. अध्यक्षपदाच्या वैध अर्जांमध्ये सिल्लोडमधील १०, कन्नड ४, पैठण ८, वैजापूर ४, गंगापूर ८, खुलताबाद १२ तर फुलंब्री नगरपंचायतीसाठीच्या ८ अर्जांचा समावेश होता..दुसरीकडे सदस्य पदाकरिता वैध ठरलेल्या एकूण ७६६ अर्जांमध्ये सिल्लोडमधील १११, कन्नडमधील ११७, पैठणमधील १८०, वैजापूर ९२, गंगापूर १०१, खुलताबाद ८५ तर फुलंब्री नगरपंचायतीमधील ८० अर्जांचा समावेश होता..Nagarparishad Nagarpanchayat Reservation : २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर .छाननीनंतर वैध ठरलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जांपैकी सिल्लोडमधील ३, पैठण व गंगापूरमधील प्रत्येकी २, वैजापूर व फुलंब्रीतील प्रत्येकी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून मागे हटला. कन्नडमधील ४ पैकी एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही हे विशेष..Maharashtra Local Body Elections: अहिल्यानगरला ११ नगर परिषदा, एका नगरपंचायतीसाठी निवडणूक, राजकीय पक्ष, नेते लागले कामाला .दुसरीकडे सदस्यपदासाठीच्या एकूण वैध अर्जांपैकी सिल्लोडमधील २२, कन्नडमधील ३१, पैठणमधील ३५, वैजापूरमधील १३, गंगापूरमधील ११, खुलताबादमधील १२ तर फुलंब्रीमधील २५ जणांनी अर्ज मागे घेतले. माघारीच्या प्रक्रियेनंतर आता सहा नगरपरिषदा व एका नगरपंचायतीमध्ये मिळून अध्यक्षपदासाठी ४२ तर सदस्यपदासाठी ६१७ उमेदवार रिंगणात कायम असल्याची स्थिती आहे..त्यामुळे आता यापुढील काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडून नगर परिषदा, नगरपंचायतीचे राजकारण कोणते वळण घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.