Wild Animal Attack : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील भरपाई आता ३० दिवसांत

Wild Animal Attack Compensation : वन्य पाण्यांच्या हल्ल्यात मृत्यू अगर जखमी झाल्यास आता वनविभागाला संबंधित व्यक्तीला ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावी लागेल.
Wild Animal Attack
Wild Animal AttackAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : वन्य पाण्यांच्या हल्ल्यात मृत्यू अगर जखमी झाल्यास आता वनविभागाला संबंधित व्यक्तीला ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावी लागेल. त्यापुढे विलंब झाल्यास व्याजासहित रकमेची भरपाई द्यावी लागेल. या संदर्भातील सुधारित वन्य प्राणी हल्ला, इजा किंवा नुकसान भरपाई विधेयक-२०२३ गुरुवारी (ता. २७) उशिरा विधान परिषदेत मंजूर झाले.

या विधेयकामध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू होणे, व्यक्तीला कायमचे अपंगत्व येणे तसेच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय पशूधन मृत्यू पावणे, जखमी होणे, पिके, फळझाडे यांसह मालमत्ता यांच्या नुकसानीबद्दल नुकसान भरपाई मागता येईल.

Wild Animal Attack
Wild Animal Attack : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना २० लाख

शिवाय खोटा दावा केल्यास १ हजार रुपये दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. प्रौढ व्यक्ती मृत झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास २० लाख रुपये, १८ वर्षांखालील व्यक्ती मृत अथवा कायमची अपंग झाल्यास पाच लाख रुपये, जखमी झाल्यास सव्वा लाख रुपये अशी भरपाई मिळते. त्याचबरोबर पशूधन बळी, अथवा मालमत्ता, पिके यांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते.

Wild Animal Attack
Wild Animal Attack : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाच वर्षात १६ बळी

विधानसभेत चर्चेद्वारे मंजूर

विधानसभेत चर्चेदरम्यान वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास भरपाईचे निकष बदलून कायद्यात त्याची तरतूद करावी, अशी मागणी आशिष जैस्वाल, नाना पटोले यांच्यासह सर्वपक्षीय सदस्यांनी केली. एखादा व्यक्ती दुचाकीवरून जात असताना त्याला वन्य प्राण्याची धडक बसली आणि तो मृत पावल्यास त्याला भरपाई मिळत नाही.

मृत व्यक्तीच्या अंगावर वन्य प्राण्याच्या हल्ल्याच्या खुणा असणे बंधनकारक आहे. तरच भरपाई दिली जाते. जर आपण अपघाती मृत्यूसाठी भरपाई द्यायला लागलो तर त्यात सर्वच अपघाती मृत्यू वन्य प्राण्यांमुळे झाले असे दाखविले जातील, अशी भीती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com