Anti-erosion embankment is in progress Agrowon
ॲग्रो विशेष

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Fund sanctioned under Konkan Project : रायगडमधील नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पाठवलेल्या एक हजार १० लाख रुपयांच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

Team Agrowon

Alibaug News : महापूर, दरडी कोसळणे, उधाण, अतिवृष्टी, वणवे अशा सर्वच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दरवर्षी सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे कोट्यवधींची वित्तहानी होते, त्याचबरोबर जीवितहानीलाही सामोरे जावे लागते.

दरवर्षी वाढत जाणारा नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी ‘कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना’ राबवण्यात येत असून रायगडमधील नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पाठवलेल्या एक हजार १० लाख रुपयांच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

आपत्ती निवारणातील काही कामे प्रदीर्घ कालावधीत करावी लागणार आहेत. तर काही कामे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राज्य सरकारने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत प्रस्तावास निधी मंजूर केला आहे.

नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज असून त्या उभारण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक हजार ८०० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. यातील एक हजार १० लाख कोटींच्या कामांना मंजुरी मिळाल्‍याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली.

२००५ पासून नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु इतक्या व्यापक प्रमाणात पहिल्यांदाच उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. नवीन व जुन्या खार बांधांचे नूतनीकरण करणे, समुद्र धूप प्रतिबंधात्मक बंधारे बांधणे,

चक्रीवादळ, पूर व दरडप्रवण गावांमध्ये निवारा केंद्र बांधणे, चक्रीवादळ, पूर व दरडप्रवण प्रमुख तालुका मुख्यालय व आपत्तीप्रवण गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे, महाड शहरनजिक सावित्री नदीलगत संरक्षक भिंत बांधणे यासाठी निधी खर्च केला जाणार आहे.

बहुउद्देशीय निवारा केंद्र

१४ गावांमध्ये निवारा शेड ५.६०

महाडमध्ये २० निवारा शेड ३६.५६

महाड जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती १.१७

चक्रीवादळ निवारा केंद्र ४१.५०

अलिबागअंतर्गत १७ शाळांची दुरुस्ती ३.७१

महाडमध्ये नवीन २८ निवारा केंद्र ६५.४९

महाडमध्ये निवारा केंद्रासाठी भूसंपादन ६.३३

जिल्‍ह्यातील भूमिगत विद्युत वाहिनी ६९९.६८

एकूण १०१०.९० कोटी

नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी बहुद्देशीय निवारा शेडची गरज आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या शाळांची दुरुस्ती करून त्यांचा वापर निवारा शेड म्हणून करणे शक्य असल्यानेही त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. निवाराशेडसह गावांमधील शाळांमध्ये आश्रय घेण्यासाठी त्‍यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. उधाणामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी, तसेच जमीन नापीक होण्यापासून वाचवण्यासाठी खारबांधबंदिस्तीही सूचवण्यात आली आहे. या सर्व उपाययोजना झाल्यास वित्तहानीसह जीवितहानी टाळता येईल.
सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT