Farmer Relief Fund : नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपयांना मंजुरी

Disbursement of Fund : अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा आहे.
Farmer Fund
Farmer FundAgrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. दोन लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांसाठी ३३२ कोटी ९६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वाढीव दरांसह मदत मंजूर झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये २७ व २९ दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कपाशी आणि तुरीला जोरदार फटका बसला होता. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी २०७ कोटी ९२ लाख ६४ हजार ८१० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. नंतर शासनाने हेक्टरची मर्यादा वाढवल्याने त्यानुसार नवा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात आला.

Farmer Fund
Farmer Relief Fund : नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी २९८ कोटींवर निधी वितरणास मंजुरी

या दोन्ही प्रस्तावांना एकत्रितपणे महसूल विभागाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. एसडीआरफच्या निकषानुसार याआधी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती. शासनाने हे प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला.

Farmer Fund
Rain Damage Relief Fund : पाऊस नुकसानाची मदत पोहोचली ३३२ कोटी रुपयांवर

शासनाच्या निर्णयानुसार कोरडवाहू शेतीसाठी आठ हजार ५०० रुपये ऐवजी १३ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपयांऐवजी २७ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी २२ हजार ५०० रुपयांऐवजी ३६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. गत वर्षांपासून शासनातर्फे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर (डीबीटीद्वारे) आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होणे आवश्यक आहे. तहसील स्तरावरून कार्यवाही करण्यात आली आहे.

असे आहे नुकसान क्षेत्र...

फळपिके सोडून जिरायती क्षेत्र एक लाख ३८ हजार १५७.१३ हेक्टर

फळपिके सोडून बागायत क्षेत्र ४४ हजार ९०२.७२ हेक्टर

फळपिके सहा हजार ६२१.८३ हेक्टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com