कळसूबाईच्या जंगलात रमलेल्या खोले दांपत्यासमोर अनेक समस्या आल्या. परंतु, त्यांनी प्रत्येकवेळी मार्ग काढला व संसार आनंदी ठेवला.दहावी शिकलेले काशिनाथ मास्तर फळ्यावर लिहितात..अ, आ, इ, ई.. आणि मग मास्तर बाराखडी बोलू लागतात. त्यांच्या मागे सारे विद्यार्थी मोठ्याने अ, आ, इ म्हणतात आणि ती अक्षरे पाटीपेन्सिलने गिरवतातदेखील. ही शाळा मात्र लहान मुलांची नसते. मास्तरच्यासमोर गावातील साऱ्या नऊवारी पातळातील कष्टकरी शेतकरी महिला बसलेल्या असतात; आणि त्यात एक विद्यार्थीनी असते ती सौ. सुमनबाई काशिनाथ खोले. .मास्तर बनलेल्या श्री. काशिनाथ चेंडू खोले यांचीच ती पत्नी. हे गमतीदार दृष्य होते ३० वर्षांपूर्वीच्या पेंडशेत गावातील प्रौढ साक्षरता शाळेचे. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील कळसूबाई पर्वतरांगेत वसलेल्या या गावातील खोले दांपत्याची ही कहाणी आहे. काशिनाथदादांची आई आजारी असायची. त्यामुळे जन्मगाव सोडून दादांनी मावशीच्या गावात चौथीपर्यंत शिकले. त्याकाळात लहान वयात लग्न करण्याची रीत होती. त्यामुळे चौथीत असताना आजोबांनी त्यांचे लग्न सुमनबाईंशी लावले. त्या घोटी भागातील शेनवड बुद्रुकचे शेतकरी काळू राणू कोकाटे यांच्या कन्या..Inspiring Farmer Story: दौंड्या काठची आरती अन् दीपक .शाळा सोडली, औत धरलालग्न झाल्यानंतरही सुमन मोठी होईपर्यंत माहेरीच राहिली; तर काशिनाथदादांनी शिक्षणासाठी पुन्हा मावशीचा गाव सोडला. मात्र, दादा दहावीत आले. पण, काही केल्या त्यांना इंग्रजी विषय जमेना. त्यांनी मग शाळेला रामराम ठोकला आणि सरळ शेतीत औत धरला. ‘‘तशी मला लहानपणापासून खरी आवड शेतीमध्येच होती. शाळा सोडल्यावर मी मनसोक्त शेती केली. पहाटे उठून धारा काढायच्या आणि सायकलवर ५०-६० लिटर दूध वाहून नेत असे..विहिरीवर तेव्हा पंप नव्हता. त्यामुळे पाणी शेंदून जनावरांना पाजावे लागे. त्यासाठी ५-६ तास जायचे. गुरांना पुन्हा डोंगरात चारायला घेऊन जावे लागत होते. कष्ट होते; पण जीवनाची मजा होती. मी आजही पहाटे उठतो. शेती व संत वारकरी संप्रदायाचे काम चालू ठेवले आहे. निर्व्यसनी लोकांना मदत करण्याची सवय मला आहे,’’ असे दादा अभिमानाने सांगतात. सुमनबाई मोठी झाल्यावर सासरी आली. त्या म्हणाल्या, ‘‘शेतीत तेव्हा मजूर टंचाई नव्हती. आमच्या रानात ४०-५० मजूर एकाच वेळी कामाला असायचे..Inspiring Farmer Story: श्रमाला देव मानणारे पांडुरंग अन् मनीषा.त्यांचे जेवण मी बनवत असे. इथे सहा बैल, ३० गायी आणि १५ म्हशींचा गोठा होता. मला गोठ्यातील सारी कामं करायची. तेव्हा एकत्र कुटुंब होती; पण सारी कामं आम्ही आनंदाने करायचे.’’ सुमनबाई घरात असल्यानंतर दादांना एक कळले की पत्नीला लिहितावाचता येत नाही. त्या कधीही शाळेत गेलेल्या नव्हती. मग गावात काशिनाथदादांनी स्वतःच प्रौढ साक्षरता वर्ग चालू केला. साऱ्या शेतकरी महिलांना ते गोळा करीत आणि शिकवत. त्या घोळक्यात सुमनबाईदेखील असायच्या..पिढीचा उद्धार झालाप्रौढ शाळेत सुमनबाई जिद्दीने शिकल्या आणि साक्षर झाल्या. काशिनाथदादा सांगतात, ‘‘शिक्षणाअभावी किती हाल होतात, हे आम्ही दोघांनी अनुभवले होते. त्यामुळे पिढीचा उद्धार करण्यासाठी मुलांना मात्र चांगले शिकवण्याचा निर्धार आम्ही केला. त्यामुळेच मोठा मुलगा धनंजय आता सिव्हिल इंजिनिअर झाला. तर, दुसरा निवृत्ती हा स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरीत लागला. तिसरा मुलगा शशिकांत केवळ दहावी शिकला..Inspiring Farmer Story: धैर्यवान पशुपालक शंकरचा लढा देतोय प्रेरणा.पण, त्यानेही छान हॉटेल टाकले आहे. ते सांभाळून तो शेतकऱ्यांसाठी प्रवचन कीर्तनात दंग असतो. मुलगी जयश्रीसुद्धा दहावीपर्यंत शिकली. पण, जावईबापू मुंबई मेट्रोत नोकरीत असल्याने जयश्री खूप मजेत असते.’’ सुखी संसाराच्या वाटचालीत काशिनाथदादा व सुमनताईंनी शेतीला देव मानले. त्यांनी पारंपरिक भात शेतीत एसआरटी तंत्रज्ञान आणले. त्यामुळे उत्पादन दुप्पट झाले. ‘‘कृषी विद्यापीठाच्या मदतीने मी भाताच्या ५४ वाणांची लागवड केली होती..त्यापैकी रायभोग, आंबेमोहोर, पर्पल, गरी कोळपी, ब्लॅक राईस व जिरवेल अशा काही जाती मी आजही जपल्या आहेत. कृषी विभागाने मला उत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरविले. तसेच, आतापर्यंत १५ पारितोषिके मिळाली आहेत. प्रयोगशील शेती सांभाळून मी संत परंपरेचा प्रसार करतो. गावात मी हरिपाठ चालू केला. दिंडीची प्रथा चालू केली.’’ असे काशिनाथदादा सांगतात..कळसूबाईच्या जंगलात रमलेल्या या खोले दांपत्यासमोर अनेक समस्या आल्या. परंतु, त्यांनी प्रत्येकवेळी मार्ग काढला व संसार आनंदी ठेवला. मी दादांना विचारले की, तुमच्या संसारातील सर्वात आनंदी क्षण कोणता? ते म्हणाले, ‘‘आम्ही दोघे रोज आनंदी असतो. कारण, आयुष्यात आमचे एकदाही, अगदी छोटेसेसुद्धा भांडण झालेले नाही!’’- काशिनाथ चेंडू खोले, ७३७८८६३७९६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.