Farmer Subsidy: अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित
Crop Loss: विक्रमगड आणि वाडा तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान वाढवले आहे. भातशेतीचे नुकसान सहन करत असतानाच अडीच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अद्याप मागील आर्थिक वर्षाचे भातखरेदी अनुदान मिळालेले नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.