Sugar Factory Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Award : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्यास राष्ट्रीय पुरस्कार

National Cogeneration Award : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्श ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी वीजनिर्मितीबद्दल सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्श ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी वीजनिर्मितीबद्दल सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पुणे, येथे नॅशनल को-जनरेशन फेडरेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी स्वीकारला.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. एन. पाटील, प्रतापराव पवार, राजेंद्र नागवडे, विवेक कोल्हे, थोरात कारखान्यातर्फे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, नवनाथ गडाख, संजय पाटील, अशोक मुटकुळे, भारत देशमुख, भाऊसाहेब खर्डे आदी उपस्थित होते.

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने उभारलेला नवीन ५५०० टन क्षमता व ३० मेगा वॅट वीज निर्मितीचा प्रकल्प हा दिशादर्शक ठरला आहे. प्रतिकूल परिस्थिती ही कारखान्याने शेतकरी सभासद व ऊस उत्पादक यांचे हित जपताना कायम उच्चांची भाव दिला आहे. याचबरोबर मागील हंगामात ८ लाख २५ हजार ९९४ मे टनाचे गाळप केले आहे.

तर मागील वर्षी ७ कोटी ८९ लाख युनिटची वीज निर्मिती केली आहे. यातून ५ कोटी २८ लाख ९३ हजार युनिट ही वीज निर्यात केली आहे. यातून कारखान्याला ३८ कोटी ७१ लाख रुपये नफा झाला आहे. कारखान्याने केलेल्या या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील कन्सिस्टंट परफॉर्मन्स (सातत्यपूर्ण कामगिरी) बदलता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

मागील वर्षीही थोरात कारखान्याला या पुरस्काराने दिल्ली येथे गौरविण्यात आले होते. प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याने शेतकरी सभासद व ऊस उत्पादकांचे हित जपताना कायम उच्चांची भाव दिला आहे. याचबरोबर मागील हंगामात आठ लाख २५ हजार ९९४ टनाचे गाळप केले. यंदा सरासरी साखर उतारा ११.५० राखला आहे. यामुळे हा पुरस्कार मिळाला असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kumbhar Community: कुंभार समाजाला मोठा दिलासा! वर्षाकाठी ७०० ब्रासपर्यंत माती काढण्याची परवानगी

Best Intercropping Systems: हमखास उत्पादनासाठी योग्य आंतरपीक पद्धती

Land Acquisition: शेती परत द्या, नाहीतर आम्हाला मारून टाका

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस स्थिरावला, कांदा दर टिकून, कोथिंबीर सुधारली तर गवारची आवक कमीच

Papaya Cultivation: आगाप लागवडीच्या पपई पिकात फुलधारणा

SCROLL FOR NEXT