Sugar Factory Award : भीमाशंकर साखर कारखाना देशात सर्वोत्‍कृष्ट

Bhimashankar sugar Mill : देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे वसंतदादा पाटील पारितोषिक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. दत्तात्रयनगर (ता. आंबेगाव, जि. पुणे) कारखान्यास मिळाले आहे.
Bidri Sugar Factory
Bidri Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

Kolhapur News : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे २०२२-२३ चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे वसंतदादा पाटील पारितोषिक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. दत्तात्रयनगर (ता. आंबेगाव, जि. पुणे) कारखान्यास मिळाले आहे.

महाराष्ट्राने २१ पैकी एकूण १० पारितोषिके मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकाविला. उत्तर प्रदेशाला चार तर गुजरात, तमिळनाडूने प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली. पंजाब, हरियाना व मध्य प्रदेशाला प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (ता. १०) या पुरस्कारांची नवी दिल्ली येथे घोषणा केली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे या वेळी उपस्थित होते.

Bidri Sugar Factory
Sugar Industry : महाराष्ट्रासह उत्तरप्रदेशचा साखर कोटा घटविला

देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे पारितोषिके जाहीर केली जातात.

यंदाच्या (२०२२-२३) वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातून ९२ सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला. त्यात महाराष्ट्र (३८), उत्तर प्रदेश (११) , गुजरात (११), तमिळनाडू (१०), पंजाब (८), हरियाना (८), कर्नाटक (४) आणि मध्य प्रदेश व उत्तराखंड (प्रत्येकी एक) सहभागी झाले होते. पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ५३ सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ३९ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला.

Bidri Sugar Factory
Sugar Factory Loan : सत्ताधाऱ्यांना थकहमी, विरोधकांची कोंडी

पारितोषिकांचे मूल्यांकन करण्यासाठी ११ सदस्यांच्या तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्याशिवाय राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ नवी दिल्लीचे मुख्य संचालक, उपसंचालक (साखर) नवी दिल्ली, राष्टीय साखर संस्था कानपूरचे संचालक, वसंतदादा साखर संस्था पुणेचे महासंचालक तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाना, कर्नाटक, पंजाब, गुजरात, तमिळनाडू या राज्यांच्या साखर संघांचे व्यवस्थापकीय संचालक आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षीचा पारितोषिक वितरणाचा विशेष सोहळा नवी दिल्ली येथे ऑगस्टमध्ये होत आहे. या शानदार सोहळ्यासाठी विशेष अतिथींना निमंत्रित करण्यात येणार आहे.

विविध विभागांनुसार पुरस्कार मिळविलेले कारखाने अनुक्रमे पुढीलप्रमाणे...

उत्कृष्ट ऊस उत्पादकता : (उच्च उतारा विभाग)

- क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी, बापू लाड शेतकरी सहकार कारखाना लि. पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली.

- लोकनेते सुंदररावजी सोळुंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर, ता. माजलगाव, जि. बीड.

तांत्रिक कार्यक्षमता :

- उच्च उतारा विभाग : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. पो. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि. जुन्नर/आंबेगाव, निवृत्तीनगर पो. शिरोली. ता. जुन्नर, जि. पुणे

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन : उच्च उतारा विभाग

- श्री खेडूत सहकारी खंड उद्योग मांडली लि. सरदार बाग, बाबेन -बार्डोली, जि. सुरत (गुजरात)

- श्री नर्मदा खंड उद्योग सहकारी मंडली लि. धरीखेडा, पोस्ट तिंबी, ता. राजपिपला (नांदोड), जि. नर्मदा (गुजरात)

विक्रमी ऊस गाळप :

- उच्च उतारा विभाग ः विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. गंगामाईनगर-पिंपळनेर, ता. माढा, जि. सोलापूर

विक्रमी ऊस उतारा :

उच्च उतारा विभाग ः डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव कदम नगर, पो. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली

अत्युत्कृष्ट साखर कारखाना

- उच्च उतारा विभाग : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल, श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन, ता. कागल, जि. कोल्हापूर.

विक्रमी साखर निर्यात

- जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. श्री कल्लप्पाअण्णा आवाडेनगर, पो. हुपरी -यळगुड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

- सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि., यशवंतनगर, ता. कराड, जि. सातारा

उर्वरित विभाग

उत्कृष्ट ऊस उत्पादकता ः दि किसान सहकारी चिनी मिल्स लि., अनुपशहर (बुलंदशहर) पो. चिनी मिल, जहांगिराबाद (उत्तर प्रदेश)

- दि नाकाडोर कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., पो. मेहातपूर, ता. नाकाडोर, जि. जालंदर (पंजाब)

तांत्रिक कार्यक्षमता

- दि कर्नाल कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., मेरुत रोड, जि. कर्नाल (हरियाना)

- दि किसान सहकारी चिनी मिल्स लि., नजीबाबाद, जि. बिजनोर (उत्तर प्रदेश).

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन

- कल्लाकुरिची कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., काचीरायापलयम, ता. कल्लाकुरिची, जि. विल्लूपुरम (तमिळनाडू)

- दि किसान सहकारी चिनी मिल्स लि., गजरौला -हसनपूर, ता. हसनपूर, जि. अमरोहा (उत्तर प्रदेश)

विक्रमी ऊस गाळप

- रामाला सहकारी चिनी मिल्स लि., रामाला बरूत, दिल्ली सहारनपूर रोड, जि. बागपत

विक्रमी ऊस उतारा

- नवलसिंग सहकारी शक्कर कारखाना मर्यादित, नवलनगर, पो. निंबोला, जि. बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश)

अत्युत्कृष्ट साखर कारखाना

उर्वरित विभाग ः डी. एस. सुब्रमनिया शिवा कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., गोपालापुरम, अलापूरम पोस्ट, ता. पप्पीरेड्डीपट्टी, जि. धर्मापुरी (तमिळनाडू)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com