Niphad Cooperative Sugar Factory
Niphad Cooperative Sugar FactoryAgrowon

Sugar Factory Award : ‘गुरुदत्त शुगर्स’चे अध्यक्ष घाटगे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Gurudatta Sugar : श्री. घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने तांत्रिक कार्यक्षमते सोबतच सामाजिक कार्यातून परिसराचा कायापालट केला आहे. कारखान्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दहा हजार कुटुंबीयांना रोजगार मिळाला आहे.
Published on

Kolhapur News : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी कारखान्याच्या माध्यमातून केलेल्या विविध सामाजिक कार्याबदल दिल्ली येथील सिया या संस्थेकडून श्री. घाटगे यांना शुगर-इथेनॉल-बायोएनर्जी या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

Niphad Cooperative Sugar Factory
Sugar Factory Award : भीमाशंकर साखर कारखाना देशात सर्वोत्‍कृष्ट

बॉलिवूड अभिनेत्री हीना खान यांच्या हस्ते श्री. घाटगे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री. घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने तांत्रिक कार्यक्षमते सोबतच सामाजिक कार्यातून परिसराचा कायापालट केला आहे.

Niphad Cooperative Sugar Factory
Sugar Factory Award : भाऊसाहेब थोरात कारखान्यास राष्ट्रीय को-जनरेशन पुरस्कार

कारखान्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दहा हजार कुटुंबीयांना रोजगार मिळाला आहे. शिरोळ तालुक्यात २००५, २०१९, २०२१ व २०२४ च्या महापुरात कारखान्यांने १० हजार पूरग्रस्त व ५ हजार जनावरांना स्वखर्चाने छावणी उभा करून महान कार्य करून हजारो पूरग्रस्तांना आधार देण्याचे काम केले आहे.

साखर उद्योगासह सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले. केद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी साखर उद्योग संदर्भात मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com