Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Season : यंदाचा आंबा हंगाम दोन टप्प्यांत

Mango market : दिवाळीच्या पूर्वसत्रात झालेल्या पावसामुळे आंब्याच्या येणाऱ्या हंगामात बागायतदारांना दोन टप्प्यांत उत्पादन मिळेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : दिवाळीच्या पूर्वसत्रात झालेल्या पावसामुळे आंब्याच्या येणाऱ्या हंगामात बागायतदारांना दोन टप्प्यांत उत्पादन मिळेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. दिवाळीच्या आधी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे आंब्याचा हंगाम डिसेंबर ते मार्च आणि मार्च ते मे अशा दोन्ही टप्प्यांत येईल, अशी शक्यता आहे.

आंब्याची बेगमी दिवाळी झाल्यानंतर गुलाबी थंडीच्या चाहुलीने सुरू होते. यंदा दिवाळी आधीच रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. हलका गारठा पडत असताना पडलेल्या पावसाने कलमांना नवीन फुटवे धरण्याची प्रक्रिया बागांमध्ये सुरू झाली. त्यामुळे मोहर प्रक्रियाही वेगाने होईल.

त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पादन लवकर येण्याची शक्यता बागायतदारांनी व्यक्त केली आहे. पहिल्या टप्प्यातील उत्पादन मार्च अखेर मिळण्याची शक्यता या पावसाने वाढविली आहे. त्यानंतर वातावरण अनुकूल राहिल्यास मार्च ते एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील फळधारणा मे अखेरीस मिळेल.

दोन्ही टप्प्यांतील उत्पादन घेण्यासाठी सध्या तरी वातावरण अनुकूल आहे. ७ नोव्हेंबरला रत्नागिरीत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर हलक्या पावसाचे सातत्य असताना काही १० रोजी पाऊस झाला. त्यामध्ये जोर नव्हता ही बाब सध्या तरी बागायतदारांच्या पथ्यावर पडणार आहे.

हापूसला मोहर येण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत २५ टक्के झाडे मोहरली असून, काही ठिकाणी कणी सेटिंग सुरू झाले आहे. ते प्रमाण कमी आहे. गतवर्षी मोहर न आलेल्या झाडांमधून उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र ते सर्व वातावरणावर अवलंबून राहणार आहे.
- विभव पटवर्धन, आंबा बागायतदार
हवामान यापुढे सामान्य राहिल्यास म्हणजे अवकाळी पाऊस नसणे, कमाल तापमान ३२-३३ अंश सेल्सिअस राहिल्यास आणि नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर पहिला आठवडा या कालावधीत किमान तापमान १७- १८ अंश सेल्सिअस राहिल्यास डिसेंबरमध्ये मोहर अपेक्षित आहे. आजच्या घडीला पूर्ण आंबा हंगामावर भाष्य करणे धाडसाचे ठरेल.
- डॉ. महेंद्र गवाणकर, संशोधक, कोकण कृषी विद्यापीठ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT