Pune News : विविध आशियायी देशातील अधिकाऱ्यांसाठी आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापन याविषयी पाचदिवसीय प्रशिक्षण मुंबई येथे सुरू आहे. या प्रशिक्षणांतर्गत शास्त्रीय प्रक्षेत्र भेटीसाठी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या आंबा बागेच्या प्रक्षेत्राची, तर नारायणगाव येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल शिंदे यांच्या अती घन पद्धतीने उभी केलेल्या आंबा बागेची निवड करण्यात आली आहे.
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, वनस्पती संरक्षण संगरोध आणि संग्रह संचालनालयाच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. वनस्पती संरक्षण सल्लागार डॉ. जे. पी. सिंग व त्यांचे सर्व अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमन कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ राहुल घाडगे, डॉ. दत्तात्रेय गावडे, योगेश यादव, फार्म मॅनेजर वैभव शिंदे, प्रगतिशील शेतकरी विठ्ठल शिंदे आणि बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूतान, वेतनाम, इंडोनेशिया आदी १६ देशांतील २५ वनस्पती रोग शास्त्रामध्ये काम करणारे शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान उपस्थितांना आंबा पिकातील कीड रोगाचे व्यवस्थापन तसेच आंबा पिकामध्ये येणारी फळमाशी व तिचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि निर्यातक्षम आंबा उत्पादनाविषयी कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी माहिती दिली. महाराष्ट्रातील हापूस, केसर आंबा आशियायी देशामध्ये व्यापार वृद्धी व्हावी यादृष्टीने प्रयत्न व्हावे यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.
कृषी विज्ञान केंद्रातील आंबा प्रक्षेत्रावर विविध आंबा जाती, आंब्यातील आयपीएम ट्रॅप, तसेच एकात्मिक कीड नियंत्रण म्युझियम दाखविण्यात आले. तसेच त्यांच्या देशांमध्ये आंबा कीड व रोगाच्या नियंत्रणाकरिता राबवत असलेल्या विविध उपायोजनाची माहिती ही त्यांच्याकडून घेण्यात आली.
त्यामध्ये फळमाशी सापळे तसेच जैविक कीड रोग व्यवस्थापन याविषयी देवाणघेवाण करण्यात आली. या प्रक्षेत्र भेटीचे आयोजन क्षेत्रीय वनस्पती संरक्षण केंद्र, मुंबई, क्षेत्रीय एकिकृत नाशिजीव प्रबंधन केंद्र, नागपूर व नाशिक यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.