
Pune News : बारामती उपविभागात २०२५-२६ या वर्षासाठी फळबाग लागवड योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. जवळपास २,०७० हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य ठरवले असून, आतापर्यंत २,६७९ शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. यापैकी १,९६१ शेतकऱ्यांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, १,५९८.९४ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी टी.के. चौधरी यांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्यांमध्ये ही फळबाग लागवड योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्यास मदत होत आहे.
तसेच, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि शाश्वत शेतीला चालना मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार, या योजनेत शेतकऱ्यांना रोपे, खते आणि तांत्रिक मार्गदर्शन यासाठी अनुदान दिले जाते. याशिवाय, फळबाग लागवडीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ठिबक सिंचन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
पीकनिहाय तपशील
आंबा : ५४२ शेतकऱ्यांना ४६१.६१ हेक्टरवर लागवड मंजूर.
केळी : ७६६ शेतकऱ्यांना ६२३.९४ हेक्टरवर लागवड मंजूर.
अंजीर : ५६ शेतकऱ्यांना ३६.६० हेक्टरवर लागवड मंजूर.
इतर फळपिके : ५९७ शेतकऱ्यांना ४७६.७९ हेक्टरवर लागवड मंजूर.
बांबू : १८.७५ हेक्टरचे लक्ष्य असूनही अद्यापी एकाही शेतकऱ्याने लागवड केलेली नाही.
बारामती उपविभागात एकूण मिळाली मंजुरी (क्षेत्र हेक्टरमध्ये)
पीक रक्कम लाखांत लाभार्थी क्षेत्र
आंबा १६५.०० ५४२ ४६१.६१
केळी १४००.०० ७६६ ६२३.९४
अंजीर १०६.२५ ५६ ३६.६०
बांबू १८.७५ ० ०.००
इतर फळपीके ३८०.०० ५९७ ४७६.७९
एकूण २०७०.०० १९६१ १८९८.९४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.