farmer Food  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Food: शेतकऱ्याची न्याहरीची चव जगात कशालाच नाही!

मी चपाती खात असलो तरी,माझी आवड, प्राधान्यक्रम भाकरीच. त्यामुळं आमच्याकडे आठवड्यातून किमान पाच दिवस तरी भाकरी बनतेच. गरम भाकरीवर तूप टाकून खायची सवय असल्याने, बहुतेकवेळा तव्यावरचीच भाकरी ताटात येते.

Maharudr Mangnale

दही, शिळी भाकरी आणि विविध चटण्यांच्या ताटाचा मी फोटो फेसबुकवर टाकतो, तेव्हा नुसतं चित्र बघून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. याचं कारण हा साधा आहार असला तरी, तो सहजपणे उपलब्ध होत नाही. तशी ही शेतकऱ्यांची न्याहरी आहे. ज्याच्याकडं किमान एकतरी दुभतं जनावर आहे, तोच याचा आनंद घेऊ शकतो. सध्या ज्वारीची भाकरी घरांमध्ये दुर्मीळ झालीयं. शहरात तर भाकरी खाण्यासाठी लोक धाबे शोधतात. भाकरी आणि पिटलं हा धाब्यावरचा खास मेनू बनलाय. तेव्हा मला माझ्या न्याहरीचं विशेष कौतूक वाटतं!

अनेक शेतकरी कुटुंबातही ज्वारीची भाकरी मिळत नाही. नव्या पिढीतील लेकरं भाकरी खात नाहीत. ते ही लोक कौतुकाने सांगतात. अनेक स्त्रियांना भाकरी करता येत नाही. यामुळं घरात भाकरी दुर्मिळ झालीय. चपाती हा सध्याचा सर्वप्रिय पदार्थ आहे. जिथं भाकरीच तयार होत नाही, तिथं हा मेनू कसा उपलब्ध होणार?

मी चपाती खात असलो तरी,माझी आवड, प्राधान्यक्रम भाकरीच. त्यामुळं आमच्याकडे आठवड्यातून किमान पाच दिवस तरी भाकरी बनतेच. गरम भाकरीवर तूप टाकून खायची सवय असल्याने, बहुतेकवेळा तव्यावरचीच भाकरी ताटात येते. दोघेच असल्याने, मोजक्या भाकरी होतात. संध्याकाळी नरेशसोबत नॉनव्हेज जेवण ठरलं की, माझी भाकरी सकाळसाठी शिल्लक राहाते. काहीवेळा उद्या सकाळच्या न्याहरीसाठी भाकरी जास्त कर, असं सांगावं लागतं आणि मग या अप्रतिम न्याहरीचा योग येतो.

या न्याहरीला केवळ शिळी भाकरी असून भागत नाही तर दहीही तेवढंच दर्जेदार असावं लागतं. रात्री विरझन लावलेल्या दुधाचं सकाळी बनलेलं दही ताजं म्हणता येईल. सकस दुधाचं दहीही तेवढंच चवदार असतं. याच्यासोबत शेंगदाणा चटणी, जवसाची, कांद्याची, लसणाची, तिळाची, कारळाची किंवा हिरव्या वा लाल ओल्या मिरचीचा ठेसा, यापैकी काहीही चालते. आमच्याकडं यापैकी किमान तीन चटण्या तरी असतातच. माझ्यासाठी हे सगळ्यात चवदार जेवण आहे. अशी चव इतर कुठल्याही जेवणाला येत नाही. गेल्या पाच दिवसांपासून सकाळची न्याहरी दही, भाकरी, चटणीचीच चालू आहे. दिवाळीचं चालू आहे म्हटलं तरी चालेल. म्हणून हे न्याहरी पुराण सुचलं.

अर्थात शालेय आयुष्यात आमच्या न्याहरीचा कायम मेनू हाच असायचा. ती खाण्याची संपन्नता शेतीमुळंच शक्य झाली. माझ्या शेतीप्रेमाच्या कारणात हा मेनूही एक आहेच. सध्या ती न्याहरी करणं म्हणजे तो भूतकाळ पुन्हा जगणं!

अशी न्याहरी करायला मिळणं म्हणजे शेतकरी असणं! त्यासाठी सर्वप्रकारच्या जोखीम पत्करून शेती करावी लागते. नफ्या-तोट्याचं गणित न घालता, मातीशी नाळ जुळवून घ्यावी लागते. प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता, वाटचाल चालू ठेवावी लागते. हे सोप नाही. मात्र त्याशिवाय दही, शिळी भाकरी आणि चटण्यांच्या न्याहरीचं मोल आणि चवही कळत नाही. केवळ पैसे आहेत म्हणून ही न्याहरी कोणालाही सहजपणे उपलब्ध होऊ शकत नाही. हे जगणं ही शेतीची देण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Disease: ‘लम्पी’ फोफावतोय

Marketing Director: पणन संचालकपदी कोण,कदम, खंडागळे की गिरी?

Agri Expo 2025: ‘सकाळ-ॲग्रोवन’चे सांगलीत कृषी प्रदर्शन

Rabi Sowing: रब्बीचा पेरा पिछाडीवर

Maharashtra Cold Weather: जळगावमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा

SCROLL FOR NEXT