Orange Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रापट्ट्याची वाताहत

Issue of Export of Oranges : संत्रापट्ट्यात एकही प्रक्रिया उद्योग नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामागे लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.

Team Agrowon

Amravati News : बांगलादेशामध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे नागपुरी संत्र्याच्या निर्यातीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. संत्रापट्ट्यात एकही प्रक्रिया उद्योग नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामागे लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.

अमरावती जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्‍टरवर नागपुरी संत्रा लागवड आहे. अमरावतीप्रमाणेच लगतच्या मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यातही नागपुरी संत्रा लागवड असून हे क्षेत्र वाढते आहे. व्यवस्थापनाच्या बळावर मध्यप्रदेशातील उत्पादकता देखील महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक आहे. महाराष्ट्रात सुमारे १० लाख टन संत्रा उत्पादन होते. यातील दोन ते तीन लाख टन संत्रा फळांची निर्यात बांगलादेशला केली जाते.

नागपुरी संत्रा उत्पादकांची आपल्या देशावरील अवलंबिता लक्षात घेता बांगलादेश सरकारने संत्रा आयात शुल्कात सातत्याने वाढीचे धोरण अवलंबिले आहे. आता तेथे अस्थिरता निर्माण झाल्याने निर्यातीबाबतही अनिश्‍चितता आहे. त्यामुळे या भागात प्रक्रिया उद्योग असावा या मुद्याला पुन्हा हवा मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षात या भागात प्रक्रिया उद्योगाची उभारणी झाली नाही,

यामागे स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता असल्याचा आरोप होत आहे. कधीकाळी नुसत्या फळ विक्रीतून अनेक गावांमध्ये आर्थिक संपन्नता नांदत होती. परंतु त्यानंतरच्या काळात बागा जगविण्यासाठी पाण्याचा झालेला उपसा त्याच्या परिणामी भुजल पातळी खालावली. या साऱ्या कारणांमुळे सरकारकडून हा भाग ड्रायझोन जाहीर करण्यात आला.

त्यामुळे पाणी उपशावरही निर्बंध आले. त्यातून अडचणीत वाढ झाली असताना आता बांगलादेशातील अस्थिरतेपायी निर्यात प्रभावीत होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने याची दखल घेत या भागात संत्रा वायनरी किंवा तत्सम प्रक्रिया उद्योग उभारावा, अशी मागणी होत आहे.

संत्रापट्ट्यात यापूर्वी एकही प्रक्रिया प्रकल्प उभा झाला नाही हे खरे आहे. आता मात्र पाठपुरावा करून संत्र्यासोबतच इतरही फळांवर प्रक्रिया व्हावी या उद्देशाने मल्टीलाईन प्रकल्प मंजूर करून आणला आहे. शेतकरी कंपनीमार्फत याचे कार्यान्वयन होणार आहे. या संदर्भाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या आहेत.
देवेंद्र भुयार, आमदार, वरुड-मोर्शी मतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT