Orange Export Technique : संत्रा उत्पादकांनी जाणले निर्यात तंत्र

Dr. Dilip Ghosh : डॉ. दिलीप घोष यांनी भारतातून होणारी लिंबूवर्गीय फळ पिकांची निर्यात सद्यःस्थिती, या क्षेत्रातील संधी याबाबत माहिती दिली.
Dr. Dilip Ghosh
Dr. Dilip GhoshAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : मृग बहारातील संत्रा फळांचा हंगाम सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रिय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या वतीने या फळांची निर्यात वाढविण्यासोबतच कापणी पश्‍चात तंत्रज्ञान या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेच्या प्रशिक्षण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

अपेडाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात १२० लिंबूवर्गीय फळ उत्पादक शेतकरी कंपन्या, संघटना, निर्यातदार सहभागी झाले होते. उद्घाटन सत्रात संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी भारतातून होणारी लिंबूवर्गीय फळ पिकांची निर्यात सद्यःस्थिती, या क्षेत्रातील संधी याबाबत माहिती दिली.

Dr. Dilip Ghosh
Orange Producer : काजळी येथील युवा संत्रा उत्पादक देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार

संत्रा बाग कीडरोगमुक्‍त व सशक्‍त ठेव्याकरिता योग्य लागवड साहित्याची निवड, जमीन या बाबी कशा महत्त्वाच्या ठरतात, याविषयी त्यांनी पावर पॉईंट सादरीकरण केले. संत्रा लागवडीच्या प्रचलीत पद्धती, संस्थेने विकसित केलेले शास्त्रोक्‍त पॅकेज, निर्यातक्षम आणि शीरा परिपक्‍व होणाऱ्या कटर व्हॅलेन्सिया यांसारख्या वाणांची माहिती देखील त्यांनी दिली. निर्यातक्षम फळे मिळण्यासाठी सुयोग्य कृषी व्यवस्थापन पद्धती का आवश्‍यक आहेत,याबाबतही त्यांनी सांगितले.

Dr. Dilip Ghosh
Orange Orchard Management : संत्रा बागेमध्ये खत- पाणी व्यवस्थापनावर भर

कार्यक्रमाला उपस्थित नागपूर कृषी महाविद्यालयाचे सह्योगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांनी देखील या वेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की संत्रा बाग कीडरोगमुक्‍त ठेवायची असेल तर बागेचे सिंचन व्यवस्थापन नियोजनबद्ध होणे गरजेचे आहे.

फुलोर येण्याच्या अवस्थेत बागेची विशेष काळजी घेतली तरी फळगळ सारख्या समस्येचे समाधान शोधता येते. तांत्रिक सत्रामध्ये लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी फळपीक लागवड व व्यवस्थापन याविषयी शास्त्रोक्‍त माहिती दिली. डॉ. तिरुग्नज्ञानवेल, डॉ. एन.एम. मेश्राम, डॉ. एस.एस. रॉय, पी.ए. बामणे यांनी देखील या वेळी मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com