Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance: पीकविमा मिळेपर्यंत माघार नाही

Farmer Protest: बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा मिळवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्यानंतर, सरकार आणि विमा कंपनीच्या आश्वासनांचा फोल ठरल्याने शेतकरी याच आंदोलनाचा रस्ता धरत आहेत.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Beed News: जोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात पीकविमा पडणार नाही तो पर्यंत माघार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत बीड जिल्हा अखिल भारतीय किसान सभेकडून विमा कंपनी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून (ता. १७) सुरू केले आहे.

खरिपातील विविध पिकांचा विमा शेतकऱ्यांनी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे भरला. हंगामात सततचा पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साचून राहिले. यामुळे बऱ्याच ठिकाणची पिके पाण्यात गेली. त्याच्या वैयक्तिक तक्रारी विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी केल्या. मात्र अद्याप देखील हजारो बाधित शेतकऱ्यांना पीकविमा पदरात पडलेला नाही. कागदोपत्री आदेश दाखवत शेतकऱ्यांचे सोयाबीन सरकारने खरेदी करणे बंद केले.

खरिपातील पीकविमा विविध कारणे दाखवत शेतकऱ्यांना डावलने अशी सरकारची भूमिका असल्याने धरणे दिली जात असल्याचे किसान सभेने कळविले आहे. किसान सभेच्या माहितीनुसार, जिल्ह्यात बहुतांश महसूल मंडलांत सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या पीक नुकसानीच्या तक्रारीचे प्रमाण २५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने तरतुदीनुसार रँडम सर्व्हे करून व्यापक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. अशा वेळी कंपनीने शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा म्हणून २५ टक्के अग्रिम विमा वितरित करण्याचा नियम आहे. यानुसार केवळ ६ लाख ५९ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाच हे अग्रिम घोषित झाले. परंतु अद्या ते मिळाले नाही, असे जिल्हाध्यक्ष ॲड. अजय बुरांडे यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT