Crop Insurance : पीकविमा परताव्याची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच

Crop Damage Compensation : मागील शेती हंगामामध्ये राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : मागील शेती हंगामामध्ये राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी केल्या, कंपनीचे प्रतिनिधी आले, प्रतिनिधींनी शेतीमालाचे नुकसान झाल्याचे मान्य केले, पण अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

शासनाने मोठा गाजावाजा करून एक रुपयामध्ये पीकविमा उपलब्ध करून दिला. पण, हे सरकार पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना पुढाकार घेताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये तर पीक विम्याचे पैसे दिले नाही, म्हणून जिल्हाधिकारी यांनी कंपनीला दंडही ठोकला होता. तरीही कंपनीला त्याचा फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.

Crop Insurance
Crop Insurance : नरखेडमधील १० हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळले

जून आणि जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. शेतांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतरही शेतकऱ्याचे नुकसान हे मोठे होते. कारण पाऊसच तेवढ्या मोठ्या प्रमाणात पडला होता. पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी केल्या.

तक्रारी केल्यावर पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसान पहावयासाठी शेतात आले. त्यांनी नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना एक फॉर्म भरून तुमचे इतके नुकसान झाले, असे फॉर्मवर लेखी दिले. ही सर्व प्रक्रिया जुलैमध्ये झाली.

Crop Insurance
Crop Insurance : नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पीकविमा निकषात सुधारणा आवश्यक

आज सहा महिने होत आहेत तरी अजूनही पीकविमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. कंपनीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हे मान्य केले तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी इतका वेळ का, असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.

या वर्षी अतिवृष्टीने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान पाहण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी आले होते. ते नुकसान पाहून गेले. नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य ही केले. पण अजूनपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आम्ही तहसील कार्यालयासह इतर कार्यालयात निवेदन दिले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
- सचिन हुरकुंडे, शेतकरी
जुलैमध्ये कंपनीचे प्रतिनिधी नुकसान पाहून गेले. पण, अद्याप भरपाई मिळाली नाही. पीकविम्याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. केवळ यात कंपनीचा भरभरून फायदा होतो. पीकविमा कुठल्याही शेतकऱ्याच्या हिताचा नाही. यात सरकार व कंपनीचाच फायदा होतो. केवळ कंपनीचेच हित जपले जाते.
- विनोद नरड, शेतकरी
माझे शेत नाल्याला लागून आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे नाल्याकाठच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकरी तीन ते चार क्विंटल सोयाबीन झाले, कपाशीची अवस्था तशीच आहे. पण, अद्याप पीकविमा कंपनीने भरपाई दिली नाही. यावर्षी उत्पादन नाही व शेतीमालाला भावही नाही, अशा अवस्थेत शेतकरी सापडला आहे. पीकविमा कंपनीने भरपाई दिली तर पीककर्ज भरण्यास मदत होईल.
- गजानन पाल, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com