Orange
Orange Agrowon

Farmer Protest: संत्र्याची नुकसानभरपाई द्यावी; शेतकऱ्यांची मागणी

Compensation for Crop Loss: तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या संत्रापिकाच्या नुकसानभरपाईसाठी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार मयूर कळसे यांना निवेदन दिले. या निवेदनात शेतकऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या, ज्यात वीजपुरवठा, पीककर्ज माफी आणि उत्पादनाच्या हमीभावाच्या कमी भावावर लक्ष केंद्रित केले.
Published on

Amravati News: मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे संत्रापिकाचे तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी निवेदने दिली. परंतु अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही.

त्यामुळे शेतकरी न्याय हक्क विचार मंचच्या वतीने शेतकरी बांधवांनी तिवसा तहसीलवर धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार मयूर कळसे यांना दिले.संत्रापिकाच्या नुकसानभरपाईच्या मागणीबरोबरच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या तहसीलदारांसमोर मांडून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

Orange
Farmers Protests : आज केंद्र सरकारचं प्रतिनिधी मंडळ करणार आंदोलक शेतकऱ्यांशी बैठकीत चर्चा

निवेदनामध्ये ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सततच्या पावसामुळे संत्रापिकाच्या नुकसानभरपाईचे पैसे शासनाने तत्काळ वितरित करावेत, शासनाने आश्वासित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करावा, पीककर्ज सरसकट माफ करावे, सोयाबीन, कपाशी, तूर पिकाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे,

Orange
Hingoli Farmers Protest : हिंगोलीच्या शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन पोलिसांनी अडवले; शेतकरी भूमिकेवर ठाम

ही पिके हमीभावाने शासनाकडून खरेदी न केल्यामुळे शासनाने फरकाची हेक्टरी ३० हजार रुपये मदत द्यावी, खरेदी-विक्रीअंतर्गत तूर व सोयाबीन नोंदणीकृत करताना शेतकऱ्यांच्या अर्जावरच नोंदणी क्रमांक टाकून पारदर्शक प्रक्रिया पार पाडावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत तहसीलदार कळसे यांना निवेदन देताना दिनेश वानखडे, जयकुमार बोके, शैलेंद्र खारकर, अशोक दरणे, दिनेश बाखडे, संजय यादव, शे. मुमताज, देविदास सुने, प्रमोद दारोकर, अमोल धामणकर, संदीप वानखेडे, अशोक अलोने, शरद खारकर, मोहन अग्रवाल, मनोज निमकर, संजय गंजीवाले, प्रमोद वानखडे, दिनेश बिजवे, शरद अग्रवाल, मंगेश खारकर, सुरेश अमझरे, पप्पू बोके, निरंजन काळबांडे, नितीन डहाके, आशिष हिवरे शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com