Market Bulletin: हरभरा दरात चढ-उतारराज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज हरभऱ्याच्या आवकेत चढ-उतारासोबतच सरासरी दरातही बदल दिसून आला. अकोला बाजारात हरभऱ्याची आवक गुरुवारच्या ३०७ क्विंटलवरून घटून आज २२२ क्विंटल झाली होती. सरासरी दरात १७० रुपयांची घसरण होऊन आजचा दर ६ हजार ७३० रुपये प्रति क्विंटल होता. तर, लातूर बाजारात हीच आवक परवाच्या तुलनेत २३ क्विंटलने वाढून आज २१९ क्विंटल झाली, सरासरी दरात ३०० रुपयांची वाढ होऊन आजचा भाव ७ हजार १०० रुपये प्रति क्विंटल झाला होता. तसेच, नागपूर बाजारात आवक परवाच्या तुलनेत २५ क्विंटलने घटून आज १७५ क्विंटल झाली, मात्र सरासरी दरात ६४ रुपयांची वाढ होऊन आजचा दर ६ हजार ८७६ रुपये प्रति क्विंटल राहिला..मेथीचे दर टिकूनआज छत्रपती संभाजीनगर बाजारात मेथीची आवक परवाच्या १४ हजार नगांवरून घटून आज ९ हजार ८०० नग झाली. सरासरी दरात ३०० रुपयांची घसरण होऊन आजचा दर ९ रुपये प्रति शेकडा राहिला. तर, पुणे-मोशी बाजारात आवक ५ हजार ८०० वरून वाढून ६ हजार ६०० नग झाली, मात्र दर १५ रुपये प्रति नगावर स्थिर राहिला होता. तसेच, श्रीरामपूर बाजारात मेथीची आवक ५ हजार ९०० नगांवरून वाढून आज ६ हजार १०० नग झाली. तर, सरासरी दर १७ रुपये प्रति नगावर कायम होता..Sugar Hoarding Restrictions: साखरेच्या साठ्यावर केंद्राची मर्यादा.आल्याच्या आवकेत चढ-उतारआल्याच्या बाजारात आज काही ठिकाणी आवक घटली असून सरासरी दरातही घसरण झाली. नागपूर बाजारात आल्याची आवक परवाच्या ८४० क्विंटलवरून घटून आज ३६० क्विंटल झाली. आवक मोठ्या प्रमाणात घटली असली तरी सरासरी दर ६ हजार १२५ रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता. तर, अकोला बाजारात आल्याची आवक परवापेक्षा आज ३५ क्विंटलने वाढून ५५ क्विंटल झाली होती. सरासरी दरात ५०० रुपयांची घसरण होऊन आजचा भाव ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल झाला. तसेच, पुणे-मोशी बाजारात आवक काहिश्या क्विंटलने वाढून आज ५१ क्विंटल पाहायला मिळाली, तर सरासरी दर ५०० रुपयांवरून घटून आज ६ हजार रुपये प्रति क्विंटल होता..Agrowon Podcast: मका दरात बदल, भेंडीच्या बाजारात चढ-उतार, काकडी आवकेत बदल, शेपूच्या दरात वाढ तर लिंबू दर टिकून.बीटचे दर स्थिरबीटच्या बाजारात आज आवकेत बदल झाला असला तरी प्रमुख बाजारांत सरासरी दर स्थिर राहिले. नागपूर बाजारात बीटची आवक परवाच्या तुलनेत १०० क्विंटलने घटून आज १०० क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर २ हजार ३७५ रुपये प्रति क्विंटलवर कायम होता. तर, पुणे-मोशी बाजारात बीटची आवक परवाच्या २० वरून घटून १५ क्विंटल झाली असून, सरासरी दर ३ हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहे. तसेच, अकलूज बाजारात हीच आवक १० क्विंटलवर कायम राहिली आणि सरासरी दरही २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिलेला पाहायला मिळाला..पेरूच्या भावात वाढपेरूच्या बाजारात आज आवक आणि सरासरी दरात चांगली वाढ दिसून आली. सांगली-फळे भाजीपाला बाजारात पेरूची आवक परवाच्या तुलनेत ७० क्विंटलने वाढून आज ७६ क्विंटल झाली. सरासरी दरात तब्बल ६ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन आजचा भाव १२ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल झाला. छत्रपती संभाजीनगर बाजारात आवक परवाच्या तुलनेत काहिशी वाढून आज ४७ क्विंटल झाली असून, सरासरी दर १ हजार रुपयांनी वाढून आज ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल झाला. अहिल्यानगर बाजारात पेरूची आवक कालच्या तुलनेत ४४ क्विंटलवरून घटून २४ क्विंटल झाली, तर सरासरी दर ७५० रुपयांनी घटून आज ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.