Gram Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Crop : वातावरणीय बदलामुळे हरभऱ्याचे देशात उत्पादन घटले; लातूरमध्ये शेतकरी चिंतेत

देशातील हरभरा पिकाच्या घट होण्याची शक्यता देखील शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. यामुळे अवकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात निसर्गाने आपला लहरीपणा दाखवल्याने अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर यानंतर पाऊस लांबल्याने रब्बी पिरकांची पेरणी देखील लांबली होती. सध्या दुष्काळामुळे शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा परिणाम थेट उत्पादनावर होत आहे. देशातील हरभरा पिकाच्या घट होण्याची शक्यता देखील शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. यामुळे अवकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान असाच अंदाज लातूर जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर केली जाते. तर काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. लातूर जिल्ह्यात यंदा २ लाख ६९ हजार ५४७ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली होती. सध्या जिल्ह्यात काही ठिकाणी हरभऱ्याची काढणी सुरू आहे. मात्र वातावरणातील बदलाचा परिणाम हरभऱ्याच्या उत्पादकतेवर होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच हरभरा पिकाची घट होईल असाही अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

दरम्यान लातूरमध्ये हवामान बदलामुळे यंदा एकरी जवळपास ६० ते ७० टक्के उत्पादन घटणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यामुळे हरभरा लागवडीसाठी घातलेला खर्च देखील निघेल की नाही, असा प्रश्न आता शेकऱ्यांसमोर उभा आहे.

घाटे अळीचा प्रादुर्भाव

हरभरा पिकावर हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसून आला आहे. पेरणीवेळी पाणी आणि त्यानंतर धुक्यासह हरभऱ्यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव झाला. याचा परिणाम हा हरभऱ्याच्या उत्पादनावर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी चिंतेत

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील काही भागात सध्या हरभरा काढणीस सुरवात झाली आहे. काढणीनंतर हाती एकरी २ ते ३ क्विंटल उत्पादन पडेल अशी शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. तर आशा परिस्थितीत सरकारने मदत करावी अशी मागणी जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

रब्बी पीकांवर रोगांचा प्रादुर्भाव

दरम्यान मराठवाड्यातील रब्बी पीकाच्या पेरणीवर पावसाने पाणी फेरले. तर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अपेक्षित पेरणी झालीच नाही. पण नोव्हेंबरअखेर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रब्बीच्या पेरणीला पसंती दिली. यामुळे धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी केली. मात्र त्यावर मर, तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला

मराठवाड्यात हरभरा धोक्यात

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्वसाधारण २ लाख ३६ हजार ८४१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत हरभऱ्याची १ लाख ४२ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. तर लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत १५ डिसेंबर अखेरपर्यंत पेरणी केली गेली.

या पाच जिल्ह्यात सर्वसाधारण ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८ लाख ३२ हजार ५७४ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्यातील २ लाख ६९ हजार ५४७ हेक्टर क्षेत्रासह धाराशिव जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ६६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

भारताचा २० टक्के हिस्सा

जागतिक पातळीवर डाळींच्या उत्पादनापैकी २० टक्के हिस्सा हा हरभऱ्याचा असून भारतात हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. उत्पादनाच्या बाबत भारताचा वाटा जगात ७०- ७५ टक्के आहे. तर देशांतर्गत डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. हरभऱ्याचा वापर हा डाळ व बेसनसाठी केला जातो.

आवक घटली

हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर केली जाते. तर काढणीचा कालावधी हा मार्च ते एप्रिल दरम्यान आहे. यानंतर हरभरा विक्रीसाठी बाहेर काढला जातो. सध्या २०२३-२०२४ मध्ये हरभऱ्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत होईल असे बोलले जात आहे. तर जानेवारी २०२४ महिन्यात हरभऱ्याची आवक ही ०.५ लाख टन झाली होती. जी गेल्या वर्षीच्या मानाने ०.३ लाख टनाने कमी झाली आहे. २०२३ साली जानेवारीत हीच आवक ०.८ लाख टन झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT