Gram Crop : हरभरा पिकावरील किडीचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन

Team Agrowon

हरभरा पिकावर परिणाम

थंडी वाढत असून काही दिवसांपुर्वीच पाऊस झाल्याने हरभरा पिकावर परिणाम देखील झाला आहे. हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुडतडणारी अळी (कट वर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

Gram Crop | agrowon

किडीचा प्रादुर्भाव

ज्यामुळे शेतकऱ्याचे या किडीचा प्रादुर्भाव थोपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हरभरा पिकावरील किडीचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन कसे कराल ते पाहूया...

Gram Crop | agrowon

कुडतडणारी अळीची ओळख

कुडतडणारी अळी ही एक बहुभक्षीय किड आहे. जी प्रामुख्याने उशिरा पेरणी केलेल्या पिकावर होते.

Gram Crop | agrowon

रंग हा भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा

मादी पतंग पिकाच्या व तणाच्या पानांवर तसेच कोवळया शेंड्यांवर एक एक करून किंवा समुहाने ३०० ते ४५० अंडी घालते. तर अळीची लांबी ही ०.२ ते १.५ इंच आणि रंग हा भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो. अळीच्या शरीरावर करड्या रंगाचा पट्टा शरीराच्या दोन्ही बाजुने असतो.

नुकसानीचा प्रकार

पाने, शेंडे कुरतडलेल्या अवस्थेत दिसुन येतात, मात्र अळी दिसत नाही. ती माती मधे लपून बसते व रात्री पाने व शेंडे कुरतडते. प्रादुर्भाव जास्त असल्यास दिवसा देखील हि अळी पिकावर आढळून येते.

Gram Crop | agrowon

व्यवस्थापन

शेतामधे किंवा बांधावर तण राहणार नाही याची काळजी घेण्यासह प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. ज्यामुळे पतंगे शेत पिकावर येणार नाहीत.

Gram Crop | agrowon
Ragi Health Benefits | agrowon
आणखी पाहा