Tembhi Gram Panchayat : टेंभी ग्रामपंचायत लेकीला देणार संसारोपयोगी साहित्य

Lek Ladki Yojana : टेंभी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील लेकींसाठी ‘लेक लाडकी माझ्या गावची’ ही योजना प्रत्यक्षात आणली आहे.
Tembhi Gram Panchayat
Tembhi Gram PanchayatAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : टेंभी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील लेकींसाठी ‘लेक लाडकी माझ्या गावची’ ही योजना प्रत्यक्षात आणली आहे. या माध्यमातून लग्न होऊन माहेरी जाणाऱ्या गावातील लेकीला ९ हजार रुपयांचे घरगुती साहित्य दिले जाणार आहे.

जिल्ह्यातील महागाव हा दुर्गम आणि मागास तालुका. येथील एका गावाने सावित्रींच्या लेकींसाठी अभिनव योजना राबवीत ग्रामसभेत ठराव घेतला. सरपंच अमोल चिकणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्याला सर्वांनी मान्यता दिली. सामान्य फंडातून त्यासाठी तरतूद करण्यात आली, अशी माहिती चिकणे यांनी दिली.

Tembhi Gram Panchayat
Rural Development : माळावरच्या वडासारखं घट्ट मनात रुतून बसलं गाव

मिक्‍सर, स्टील फिल्टर, ताट, वाटी, पेले, तांब्या, कढई, पिंप, बकेट, घागर, पकड, पळी, झारा, भातवाडी, सारी, बरणी, प्लेट, चमचा, जेवणाचा डबा, लाकडी पाट यासह इतर कौटुंबिक साहित्य लेकीला देण्यात येईल.

Tembhi Gram Panchayat
Rural Development : सरपंचांनो, विकास आराखड्याचा आढावा घ्या...

योजनेच्या लाभासाठी आईवडील गावचे रहिवासी असावे. घरच्यांच्या मान्यतेने विवाह झालेला असावा. कुटुंबाने ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. त्यासोबत वयाचा दाखला जोडावा, असे ठरविण्यात आले आहे.

ग्रामपंचायत पहिल्यांदाच अविरोध

३००० लोकवस्तीच्या या गावात २०२१ मध्ये पहिल्यांदाच सुशिक्षित युवकांनी एकत्रित येत निवडणूक लढविली. त्याला ग्रामस्थांची जोड मिळाली आणि पहिल्यांदा गावातील सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध निवडण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com