Ragi Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Ragi Crop : गगनबावड्यात नाचणी पिकाकडे वाढतोय कल

Crop Update : कमी पाण्यात, कमी खताच्या वापरात अधिक धान्य उत्पादनाबरोबरच ऐन उन्हाळ्यात जनावरांना सकस चाऱ्याची होणारी उपलब्धता या जमेच्या बाजूंमुळे गगनबावडा तालुक्यात उन्हाळी नाचणीचे क्षेत्र वाढत असल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कमी पाण्यात, कमी खताच्या वापरात अधिक धान्य उत्पादनाबरोबरच ऐन उन्हाळ्यात जनावरांना सकस चाऱ्याची होणारी उपलब्धता या जमेच्या बाजूंमुळे गगनबावडा तालुक्यात उन्हाळी नाचणीचे क्षेत्र वाढत असल्याचे चित्र आहे.

विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडापार्क, कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक पिसाळ, समन्वित नाचणी सुधार प्रकल्पाचे नाचणी पैदासकर डॉ. योगेश बन यांनी वेतवडे येथील उन्हाळी नाचणी लागवड केलेले प्रयोगशील शेतकरी रणजित आढाव,

मार्गेवाडीचे मोहन पडवळ आणि खोकुर्ले तर्फे पडवळवाडीचे संभाजी पडवळ यांच्या उन्हाळी नाचणी प्रक्षेत्रांना भेटी देऊन पाहणी केली. पिकाच्या निकोप वाढीबद्धल समाधान व्यक्त केले. पीक पक्वता, काढणी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाड, मंडल कृषी अधिकारी गजानन खाडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रम कार्वेकर, पंचायत समिती कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव, कृषी सहायक शहाजी बळीप, योगेश देशमाने, भाग्यश्री तिळवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

उन्हाळी हंगामात नाचणी लागवडीसाठी विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडापार्क येथून प्रसारित केलेल्या फुले नाचणी आणि फुले कासारी या सुधारित वाणांचा शेतकरी वापर करीत आहेत. खरिपासाठी शिफारशीत हे दोन्ही वाण उन्हाळी हंगामात देखील चांगले उत्पादन देत असल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.
डॉ. अशोक पिसाळ, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडापार्क, कोल्हापूर
गगनबावडा तालुक्यात उन्हाळी नाचणीचे क्षेत्र वाढवण्यास वाव आहे. त्यादृष्टीने आत्माच्या माध्यमातून उन्हाळी नाचणीखालील क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
रमेश गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, गगनबावडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT