Summer Ragi Fodder : जनावरांसाठी पौष्टिक उन्हाळी नाचणीचा चारा

Team Agrowon

अलीकडे बऱ्याच भागात उन्हाळी नाचणी घेतली जाते. नाचणीची कणसे खुडून झाल्यानंतर पाने हिरवी आणि खोड रसरशीत असतात. याचा उपयोग चारा म्हणून होतो.

Summer Ragi Fodder | Agrowon

टंचाई काळात लोह आणि कॅल्शिअमचा एक उत्तम स्रोत असलेला हा चारा जनावरांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो.

Summer Ragi Fodder | Agrowon

उन्हाळ्यात जेव्हा इतर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असते तेव्हा उन्हाळी नाचणीपासून चारा मिळतो.

Summer Ragi Fodder | Agrowon

खरिपातल्या नाचणीपेक्षा जास्त प्रमाणात म्हणजेच एकरी चार ते पाच टन चारा उन्हाळी नाचणीपासून उपलब्ध होतो.

Summer Ragi Fodder | Agrowon

फुले नाचणी जातीला उन्हाळी हंगामात नत्राची योग्य मात्रा आणि पुरेसे पाणी दिले गेले असल्यास पिकाची साडेतीन ते चार फूट उंची मिळते.

Summer Ragi Fodder | Agrowon

नाचणीची कणसे खुडून झाली तरी पाने हिरवी आणि खोड रसरशीत असते.

Summer Ragi Fodder | Agrowon

नाचणीचा ओला चारा आणि सुक्या चाऱ्याच्या तुलनेत जास्त पौष्टिक असतो. जो जनावरांसाठी उन्हाळ्यात अत्यंत चांगला पर्याय आहे.

Summer Ragi Fodder | Agrowon