White Ragi Crop : सफेद नाचणीचा कातवडमध्ये यशस्वी प्रयोग

Ragi Crop Experiment : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातवड (ता.मालवण) येथील शेतकरी कृष्णा बाबाजी घाडी यांनी दापोली सफेद नाचणी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
Krushna Babaji Ghadi and Ragi
Krushna Babaji Ghadi and Ragi Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातवड (ता.मालवण) येथील शेतकरी कृष्णा बाबाजी घाडी यांनी दापोली सफेद नाचणी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. हा जिल्ह्यातील पहिला प्रयोग असल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नाचणी लागवड केली जाते. त्याकरिता पारंपरिक बियाणेच वापरले जाते.

नाचणी हे भरड धान्यापैकी एक महत्त्वाचे पीक असून, अलीकडे या नाचणीला मागणी देखील वाढू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळ्यात देखील नाचणी लागवड केली जाते. दरम्यान, जिल्ह्यात प्रथमच मालवण तालुक्यातील कातवड येथील श्री. घाडी यांनी सफेद नाचणीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.

Krushna Babaji Ghadi and Ragi
Paddy and Ragi Registration : भात व नाचणी विक्रीसाठी शेतकरी नोंदणीस मुदतवाढ

त्याकरिता त्यांनी दापोली सफेद हे बियाणे वापरले. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राकडून त्यांना २०० ग्रॅम बियाणे देण्यात आले. सेंद्रिय पद्धतीने त्यांनी नाचणीचे उत्पादन घेतले. तीन महिन्यांत नाचणी परिपक्व झाली आहे. लागवडीपासून काढणीपर्यंतची नोंद त्यांनी ठेवली आहे.

Krushna Babaji Ghadi and Ragi
Ragi Crop : चंदगड तालुक्यातील सदानंद गावडे यांनी नाचणी पिकात तयार केली ओळख

श्री. घाडी यांचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे भविष्यात सिंधुदुर्गात सफेद नाचणी लागवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नाचणीची काढणी झाल्यानंतर राहिलेले अवशेष जनावरांसाठी चारा म्हणूनही उपयोगात येतात. २०० ग्रॅम लागवडीतून साधारणपणे ४० किलो उत्पादन त्यांना मिळाले.

नाचणीचे आहारातले महत्त्व वाढले आहे. त्यामुळे आहारात नाचणी पुन्हा शेतकऱ्यांच्या आहारात आली आहे. भरडधान्याची आहारातील आवश्यकता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झाली आहे. याचा प्रसार व प्रचार व्हायला अजून थोडा वेळ लागणार असला तरी त्यानंतर मात्र नाचणीला चांगली मागणी असेल. मागणीच्या तुलनेने पुरवठा कमी असेल त्यामुळे हा उन्हाळी नाचणी लागवडीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणार आहे
धनंजय गावडे, कृषी पर्यवेक्षक, कातवण, ता.मालवण.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com