Water Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scheme : शिंदखेड्यातील ८५ गावे पाणी योजनेचे काम अपूर्णच

Water Supply Scheme : डिसेंबर २०२४ अखेर काम पूर्ण करण्याची मुदत असतांना त्या कालावधीत योजना पूर्ण होणार नाही असे कल्याण टोल इन्फ्रा ठेकेदाराच्या निष्क्रीयतेवरून स्पष्ट होते.

Team Agrowon

Dhule News : शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी सद्यःस्थितीत भीषण पाणीटंचाई असताना ३०० कोटी रुपये खर्चाच्या जलजीवन मिशनअंतर्गत काम सुरु असलेल्या ८५ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी एप्रिल, मे महिनाअखेर काही गावांना ट्रायलबेसवर तरी उपलब्ध होण्याची आशा होती.

परंतु, ज्या जलकुंभातून पाणी सिंचन करून ग्रॅव्हीटीने सोडणार ते जलकुंभाच्या कामासह मुख्यजलवाहिनी व गावांतर्गत जलवाहिनीची कामेही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक अपूर्ण आहेत. डिसेंबर २०२४ अखेर काम पूर्ण करण्याची मुदत असतांना त्या कालावधीत योजना पूर्ण होणार नाही असे कल्याण टोल इन्फ्रा ठेकेदाराच्या निष्क्रीयतेवरून स्पष्ट होते.

त्यामुळे पुढील वर्षातही या गावांतील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील जनतेसाठी दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे. परंतु, योजनेचे कासवगतीने काम सुरू आहे. योजना कुठून कशी येणार? पाणी दरडोही किती मिळणार, याबाबत गावांना प्रचार व प्रसार झालेला नाही.

काम सुरु असलेल्या गावांना कामाचे माहिती फलक लावलेले नाहीत. साइटवर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अधिकृत शासकीय उपअभियंता, शाखा उपअभियंता उपस्थित राहणे महत्त्वाचे असताना त्यांच्या गैरहजेरीत निकृष्ट दर्जाचे काम होत आहे.

तसेच, ३०० कोटी रुपये खर्चाच्या योजनेबाबत अनभिज्ञ असलेल्या जनतेला माहितीसाठी ग्रामसभा घेऊन मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. कारण, येणाऱ्या काळात हा कळीचा मुद्दा होऊ शकतो, असे ग्रामस्थांचे मत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT