Water Scheme Fund : आटपाडीतील वंचित बारा गावांच्या कामासाठी अधिवेशनात निधी द्यावा

Warning of Agitation : अधिवेशन काळातच मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर आणि आनंदराव पाटील यांनी दिला.
Tembhu Scheme
Tembhu SchemeAgrowon

Sangli News : टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या आटपाडी तालुक्यातील १२ गावच्या मंजूर पाणी योजनेच्या पूर्ततेसाठी तातडीने घेतल्या जाणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा अधिवेशन काळातच मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर आणि आनंदराव पाटील यांनी दिला.

योजनेत समाविष्ट वंचित गावांच्या पाणी योजनेच्या कामासाठी निधी द्यावा, यासाठी लिंगीवरे (ता. आटपाडी) येथे बुधवारी (ता. १४) पाणी परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटणकर होते. या वेळी चळवळीचे आनंदराव पाटील, जनार्दन झिंबल, हणमंतराव देशमुख, सादिक खाटीक आदी उपस्थित होते. गुळेवाडी, विभूतवाडी, धावडवाडी, राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी (दिघंची), पांढरेवाडी, उंबरगाव, पिंपरीखुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी आणि वलवण या बारा वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश केला आहे.

Tembhu Scheme
Jaljeevan Water Scheme : पाणीयोजनेच्या कामाला मुहूर्त मिळेना

या गावच्या पाणी योजनेच्या कामासाठी तातडीने निधी देऊन अन्य सोपस्कार पार पाडावेत, अशा मागणीचा ठराव केला. लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विधानसभेच्या अधिवेशनात निधीची तरतूद करून निविदा काढावी. यासाठी अधिवेशन काळातच आझाद मैदानावर वंचित १२ गावच्या शेतकऱ्यांसमवेत ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा डॉ. पाटणकर आणि पाटील यांनी केली.

Tembhu Scheme
Water Supply Scheme : मुळशीच्या पाण्याबाबत नऊ फेब्रुवारीला जन सुनावणी

राजेवाडी तलावात जिहे कटापूर योजनेतून आणले जाणारे नदीचे पुराचे पाणी मृगजळ आहे. त्यापेक्षा टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनच्या शाश्वत पाण्यासाठी निधीची तरतूद करावी. पाणी चळवळ या लढ्याचे नेतृत्व करणार आहे.

या लढ्यात शेतकऱ्यांनी याचा निर्धार आणि नियोजन करावे, असे आवाहन डॉ. पाटणकर यांनी केले. आनंदराव पाटील, सादिक खाटीक यांची भाषणे झाली. सदस्य जनार्दन झिंबल यांनी स्वागत केले. हणमंतराव देशमुख, सादिक खाटीक, साहेबराव चवरे, मनोहर विभूते, राजेवाडीचे सरपंच प्रशांत शिरकांडे यांची भाषणे झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com