Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : ‘वारणा धरणाची’ पाणी पातळी खालावली

Water Crisis : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊ लागले आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : ऐन उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गेले चार महिन्यांपासून वाकुर्डे योजनेतून व वारणा डावा कालव्यातून पाणी सोडल्याने वारणा धरणातील पाणीसाठा गत वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये सुमारे ५ टीएमसीने कमी झाला आहे.

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊ लागले आहे. अशातच पिण्याचे पाणी, शेती तसेच विविध योजनांमार्फत चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

त्यामुळे महिन्याकाठी आता चार ते पाच टीएमसी पाण्याचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे धरणात सध्या १६.१० टीएमसी इतका पाणीसाठा असून यातील उपयुक्त पाणीसाठा ९.२२ टीएमसी शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ३३.५१ आहे. सध्या धरणातून कालवा, तसेच नदीमार्फत १३७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

साधारणतः १५ जूनपासून पावसाला सुरुवात झाली तर यंदा ‘वारणा’ पट्ट्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, असे सध्या तरी चित्र आहे. मात्र, ठिकठिकाणी फुटलेले कालवे, लाखो लिटर वाया जाणारे पाणी आणि भविष्यात पाऊस लांबला तर येणारे संकट याचा धरण प्रशासनासह सर्वांनीच अंदाज बांधून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नागरिक, शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाण्याचा अपव्यय होणार नाही, तसेच पाऊस लांबला तरी उर्वरित पाणी कसे पुरेल, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

पाणीसाठा ३३.५० टक्के शिल्लक

सध्या धरणात पाण्याची पातळी ६०५ मीटर आहे. धरणात १६.१० टीएमसी पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा ३३.५० टक्के शिल्लक आहे. वाकुर्डे योजना सुरू झाल्याने टंचाईमुळे शिराळा व वाळवा तालुक्यांतील नागरिकांची पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे सतत पाणी सोडावे लागत असल्याने धरणाच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.

कडक उन्हामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी गेले चार महिन्यांपासून नागरिकांची मागणी वाढली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर मागणी आल्याने मागणीनुसार पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाच टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. पुढील दोन महिन्यांसाठी आणखी पाण्याची आवश्‍यकता गृहीत धरून नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्‍यक आहे.
- गोरख पाटील, शाखा अभियंता, वारणावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT