Jalgaon News : जिल्ह्याचे पर्जन्यमान ९ हजार ५७४.९८ मिलिमीटरनुसार सरासरी ६३८.३३ मिलिमीटर आहे. माॅन्सूनच्या तीन महिन्यांत ८१ पैकी २४ ऑगस्टपर्यंत केवळ ३९ दिवस पावसाने हजेरी आहे तर ४२ दिवस कोरडेच असून, जुलैच्या शेवटच्या सप्ताहापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्हाभरात १५ ऑगस्टनंतर जोरदार हजेरी लावली आहे..जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान ५०९ मिलिमीटर पर्जन्यमान आहे. त्यानुसार सरासरी ४१९.४ मिलिमीटरनुसार १२१.३६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात १३ हजार हेक्टरवरील खरिपाचे नुकसान झाले असले तरी २२ ते २५ दिवसांच्या खंडामुळे पावसाची तूट निर्माण झाली होती. गत सप्ताहापासून जिल्ह्यात १४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आठवडाभरात झालेल्या पावसाने काहीअंशी तूट भरून काढली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाची तूट निर्माण झाली होती. आता मात्र ही तूट काही प्रमाणात भरून निघाली आहे. गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला असून, यामध्ये सर्वाधिक ३५ मिलिमीटरची नोंद जळगाव तालुक्यात झाली आहे..जोरदार पावसाचा अंदाजजिल्ह्यात या सप्ताहात पावसाने जोरदार हजेरी लावत दोन दिवसांपासून जळगाव तालुका परिसर वगळता अन्य ठिकाणी उघडीप दिली आहे. आगामी सप्ताहात रविवार ते बुधवार, गुरुवार दरम्यान ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तापमान कमाल २७ ते किमान २४ अंशादरम्यान तर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७८ टक्के आहे. आगामीसप्ताहात रविवार (ता. २४) वगळता २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान वेगवान वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे..Pune Rain Update : पावसामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना करण्यात आलं स्थलांतरित.शहरात आज (ता. २३) दुपारी पावणेतीन ते सव्वातीनच्या दरम्यान पावसाने जोरदार ‘बॅटिंग’ केली. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात पाणीच पाणी साचले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. नंतर मात्र पावसाने ब्रेक घेतला होता. दुपारी पावणेतीनच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह पाउस सुरू झाला. अर्धा तास शहरातील नटवर टाकीज परिसर, नवीपेठ परिसर, घाणेकर चौक, पांझरापोळ चौक, कालिका माता मंदिरावरील रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या सरासरीत मोठी वाढ झाली आहे. त्यानुसार यंदाही सप्टेंबर महिन्यातील सरासरीत वाढ होऊन सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. परतीचा पाऊस लांबला तर जिल्ह्यात ऑक्टोबर मध्यापर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे..‘गिरणा’वरील पाच प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गिरणा प्रकल्पाची पाणीपातळी ७२.३५ टक्क्यांवर पोचली आहे. गेल्या सप्ताहात झालेल्या दमदार पावसामुळे जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्पात सद्यस्थितीत ७३.९९ टक्के जलसाठा झाला असून, लवकरच प्रकल्प पूर्णत्वाकडे पोचण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १४ मध्यम आणि ९६ लघू प्रकल्प पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बहुतांश प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे..Monsoon Rain Update: ताम्हिणी घाटात ‘रेकॉर्ड ब्रेक’ ५७५ मिमी पावसाची नोंद.जिल्ह्यातील प्रकल्पांत ५७ टक्के उपयुक्त साठाजळगाव : जिल्ह्यात तीन मोठे, १४ मध्यम आणि ९६ लघू सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी जिल्ह्याच्या पूर्व भागातील सुकी आणि मोर तर पश्चिम भागातील मन्याड आणि अंजनी असे चार मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा ७२.३६ आणि वाघूर ७३.९९ टक्के जलसाठा असून, होत असलेली आवक लक्षात घेता लवकरच पूर्ण क्षमतेने भरले जातील, असे सांगण्यात आले.जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर असे तीन मोठे प्रकल्प असून, हतनूर प्रकल्पात ४०.३९ टक्के साठा आहे. गेल्या २४ तासांत ८९.४७ दशलक्ष घनमीटर अर्थात ३.१६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. हतनूर प्रकल्पात पाण्याची होत असलेली आवक पाहता प्रकल्पाचे ४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून २२ हजार ५९६ क्यूसेक प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे..आकडे बोलतातधरणातील पाणीसाठा असाधरण टक्केवारीगिरणा ७३.३६हतनूर ४०.३९वाघूर ७४.९९मंगरूळ १००सुकी १००अंजनी १००मन्याड १००अभोरा ८७.२२मोर ७७.४१अग्नावती १७.७१हिवरा १६.६०बहुळा ६१.४७तोंडापूर ९०.२७गुळ ५७.१४भोकरबारी १६.९२बोरी २७.३०शेळगाव ३.८२पावसाचे सरासरी दिवसमहिना पर्जन्यमान पावसाचे दिवस सरासरी पाऊस टक्केजून १२३.७ १६ १२४ १००जुलै १८९.२ १३ १४६.६ ७२.०ऑगस्ट १९६.१ १० १४८.८ ७५.९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.