Dhule News : आठवडाभरात झालेल्या पावसाने तालुक्यातील पिकांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. तालुक्यातील बहुतांश पेरणी पूर्ण झाली असून, पावसाने दांडी मारल्यामुळे पिक आधीच्या पावसावर किंवा विहीर-बोअरच्या पाण्यावर तग धरून होती. आता आलेल्या पावसामुळे बिगर बागायती शेतीला दिलासा मिळाल्याने शेतकरी सुखावले आहेत..मे, जून आणि जुलै महिन्यात तालुक्यात पावसाची चांगली नोंद झाली होती. मात्र जुलै अखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत पाऊस गायब झाल्याने भात लागवडीसह इतर पिके करपण्याच्या स्थितीत आली होती. सुदैवाने, गेल्या काही दिवसांत झालेल्या सर्वदूर पावसामुळे पिके चांगल्या स्थितीत आली आहेत..Fertilizer Shortage: खत आत्मनिर्भरतेचे वास्तव.तालुक्यातील पिकांची वाढ इतर तालुक्यांच्या तुलनेत समाधानकारक दिसत आहे.तथापि, पावसाने दिलासा मिळाल्यानंतरही शेतकरी आता खतटंचाईमुळे चिंतेत आहेत. युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी नवापूरसह साक्री, सोनगड, व्यारा (गुजरात) भागात भटकंती करत आहेत. दरम्यान, तालुक्यातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खोडोपाडी रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले असून, दळणवळण विस्कळीत झाले आहे..Kharif Season : वाढीस लागलेली पिके टाकू लागली माना.खतांच्या साठेबाजीने शेतकरी त्रस्तदोन-दोन दिवस रांगेत उभे राहून, रात्री मुक्काम करूनही खत मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या संदर्भात शासनाने किती युरीया खताची तरतूद केली आहे व दुकानदारांना किती पुरवठा झाला, याची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..दृष्टिक्षेपातनवापूर तालुक्यातील पिकांना जीवदानभात लागवड, पेरणी पूर्णयुरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी चिंतेतखत साठेबाजीबाबत चौकशीची मागणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.