Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनीची पाणी पातळी अखेर उणेपातळीत

Ujani Dam Water Level : यंदा कमी पाऊसमानामुळे धरणातील पाणीसाठा केवळ ६६ टक्क्यांपर्यंत झाला होता.

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील पाणीपातळी रविवारी (ता. २१) सायंकाळी उणेमध्ये पोचली आहे. यंदा कमी पाऊसमानामुळे धरणातील पाणीसाठा केवळ ६६ टक्क्यांपर्यंत झाला होता.

पण गेल्या पाच-सहा महिन्यांपासून नदी, कालव्यासह विविध योजनांसाठी वापरलेल्या पाण्यामुळे हळूहळू पाणीसाठा कमी होत हा साठा उणेपातळीत पोचला आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच जानेवारी महिन्यातच धरण उणेमध्ये गेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच एमआयडीसींना तर पुणे जिल्ह्यातील काही एमआयडीसींना उजनीतूनच पाणीपुरवठा होतो.

कर्जत- जामखेड, धाराशिव, सोलापूर, इंदापूर, बारामती शहरासह सोलापूर जिल्ह्यातील १००हून अधिक ग्रामपंचायती व नगरपालिकांचा पाणीपुरवठा उजनीवरच अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पावणेदोन लाख हेक्टर जमीन उजनीमुळे सिंचनाखाली आली आहे.

त्यामुळे उजनी धरणातील पाण्याला मोठे महत्त्व आहे. पण यंदा कमी पाऊसमानामुळे धरणातील पाणीसाठा जेमतेम ६६ टक्क्यांपर्यंत झाला. या आधी शेतीसाठी पहिली पाणीपाळी सोडण्यात आली. आता गेल्याच आठवड्यात पुन्हा दुसरी पाणीपातळीही सोडण्यात आली, आता धरणातील संपूर्ण पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

धरणातील पाणीसाठा उणे ०.३९ टक्के

सोमवारी (ता.२२) धरणातील एकूण पाणी पातळी ४९१ मीटर इतकी राहिली असून, धरणातील एकूण पाणीसाठा ६३.४५ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे ०.२१ टीएमसी एवढा आहे. तर या पाण्याची टक्केवारी उणे ०.३९ टक्के इतका आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT