Ujani Dam : उजनीतील गाळ काढण्याचा मुहूर्त कधी?

Ujani Water Update : सोलापुर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात ४२ वर्षांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता खूपच कमी झाली आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापुर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात ४२ वर्षांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता खूपच कमी झाली आहे. त्यामुळे अनेकदा शंभर टक्के भरलेले धरण दरवर्षी तीन-चार महिन्यातच रिकामे होत आहे. गाळ काढल्यास १५ ते १८ टीएमसी साठवण क्षमता वाढून पाणीप्रश्न कायमचा सुटू शकतो. पण, गाळ काढण्याला २०१९पासून मुहूर्त मिळालेला नाही हे विशेष.

मार्चमधील अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणातील गाळ काढण्याची निविदा प्रक्रिया दीड महिन्यात सुरू होईल, असे आश्वासित केले होते. २०११ मध्ये केंद्रीय जल आयोगाच्या आदेशानुसार दिल्लीतील तेजो विकास इंटरनॅशनल या खासगी संस्थेने ‘डीजीपीएस’ या तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार उजनीत गाळमिश्रित वाळूचे

Ujani Dam
Ujani Dam : उजनीतून शेतीला पाणी सोडण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच आवाहन

प्रमाण २७.९४ टक्के होते. यानंतर धरणात आलेला गाळ गृहीत धरल्यास धरणाची पाणी साठवण क्षमता ३२ टीएमसीने कमी झाल्याचे समोर आले होते. यापूर्वी राज्य शासनाच्या अखत्यारितील नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) सन २००७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार उजनी धरणात १२.७७ टक्के इतका गाळ होता.

Ujani Dam
Ujani Dam : उजनी पाणलोट क्षेत्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर?

त्यानंतर त्याच संस्थेच्या २०१९ मधील सर्वेक्षणानुसार उजनीच्या मृत व जिवंत साठ्यात १४ टीएमसी गाळ असल्याचे स्पष्ट केले होते. या दरम्यान २०१८ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात गाळ काढण्याचा निर्णय झाला.

त्यावेळी आलेल्या निविदा कागदपत्रात संदिग्धता आणि अंतर्विरोध असल्याने निविदा प्रक्रिया स्थगित करावी लागली. त्यानंतर मार्चमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा दीड महिन्यात गाळाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा शब्द दिला. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही.

गाळाच्या अभ्यास करणाऱ्या समितीने उजनी धरणातील गाळासंबंधीचा अहवाल जलसंपदा विभागाला सादर केला आहे. आता शासन स्तरावरून गाळ काढण्यासंदर्भातील निर्णय अपेक्षित आहे.
भाऊसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com