Fake Pesticide Agrowon
ॲग्रो विशेष

Pesticide Use : कीटकनाशकांचा वापर घटला

Pesticide Ban News : भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून दर्जेदार कलमे, रोपांचे उत्पादन होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यानुसार देशभरातील संशोधक संस्थांना देखील त्याबाबत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : संशोधक संस्थांद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांच्या परिणामी देशात कीटकनाशकांचा वापर गेल्या काही काळात कमी झाला आहे, असा दावा भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहाव्यवस्थापक (पीक विज्ञान आणि फलोत्पादन शास्त्र) डॉ. टि. आर. शर्मा यांनी केला.

नागपूर दौऱ्यावर आलेल्या डॉ. शर्मा यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘एकात्मिक कीड नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासोबतच कापसासारख्या पिकात येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांची फवारणी शेतकरी करीत होते.

परंतु केंद्रीय कापूस संशोधन संस्था, कृषी विद्यापीठांकडून किडरोगांचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच उपाययोजनांबाबत सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी आता त्यानुरूप आणि मर्यादित कीटकनाशकांचा वापर करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे देशात कीटकनाशकांचा वापर कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.

परंतु त्याचवेळी काही भागात शिफारशीत मात्रांपेक्षा अधिक आणि एकमेकांत अनेक कीटकनाशकांची सरमिसळ करून फवारणी होते. त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होतात. त्याबाबतही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.’’ या वेळी केंद्रीय कापूस उत्पादन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद उपस्थित होते.

‘दर्जेदार कलमे, रोपे उत्पादनाचे प्रयत्न’

‘‘भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून दर्जेदार कलमे, रोपांचे उत्पादन होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यानुसार देशभरातील संशोधक संस्थांना देखील त्याबाबत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कारण दर्जेदार फळ उत्पादनात गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य देखील तितकेच महत्त्वाचे राहते. संशोधक संस्थांची रोपे तयार करण्याची क्षमता नसल्यास खासगी रोपवाटिकांना सशुल्क तंत्रज्ञान हस्तांतरित करून त्याद्वारे रोपांच्या उत्पादनावर भर दिला गेला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची पुर्तता व्हावी, असा उद्देश त्यामागे आहे,’’ असे डॉ. शर्मा म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT