Dr. Hanuman Garud Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : मृदेच्या आरोग्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर आवश्यक

Dr. Hanuman Garud : जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र खामगावचे विषय विशेषज्ञ कृषी विद्या डॉ. हनुमान गरुड यांनी केले.

Team Agrowon

Beed News : जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र खामगावचे विषय विशेषज्ञ कृषी विद्या डॉ. हनुमान गरुड यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव यांच्या वतीने चाकरवाडी (ता. बीड) येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गरुड बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विनोद कवडे, ग्रामसेवक भस्मारे, गजेंद्र अढावे उपस्थित होते.

डॉ. हनुमान गरुड यांनी जागतिक मृदा दिनानिमित्त जागतिक मृदा दिनाचे महत्त्व, पार्श्‍वभूमी, उद्दिष्ट सांगून यावर्षीच्या ‘माती आणि पाणी : जीवनाचा स्रोत’ या थीमनुसार उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जगातील ९५ टक्के अन्नधान्य गरज ही मृदेच्या माध्यमातून भागवली जाते.

तसेच मृदेत पृथ्वीवरील एकूण सजीवांपैकी २५ टक्के सजीव आसरा घेतात. म्हणून मातीचे संवर्धन करणे अत्यावश्यक ठरते. जमिनीत ५ टक्के सेंद्रिय पदार्थ आवश्यक असतात. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण राखले जाते.

पिकांची उत्पादकता आणि जमिनीचा पोत राखण्यासाठी सेंद्रिय पदार्थ व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण महत्त्वाचे आहे. यासाठी जमिनीचे अन्न म्हणून प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत इ सेंद्रिय खतांचा वापर करावा, असा सल्ला दिला.

डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी कृषी विज्ञान केंद्राचे कार्य, उद्दिष्टे त्याचबरोबर माती परीक्षणाचे महत्त्व विविध उदाहरणे सांगून उपस्थितांना पटवून दिले. आढावे यांनी माती तपासणीसाठी प्रातिनिधिक नमुना घेण्याची पद्धत सांगितली व नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, शेतकरी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस पाटील नानासाहेब काकडे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT