Radhika Mhetre
जमिनीची पूर्वमशागत आणि आंतरमशागत योग्य प्रकारे करावी.
शेतात जल व मृदसंधारणाची कामे केल्याने जमिनीची धुप कमी होऊन जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.
भरखतांचा म्हणजेच शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत आणि लेंडीखताचा वापर हेक्टरी किमान पाच टन या प्रमाणात करावा.
शेतातील अवशेष न जाळता ते शेतातच कुजवावेत.
जैविक किंवा जिवाणू खतांचा वापर, रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
हिरवळीच्या खतांचा वापर केल्यामुळेही जमिनीची सुपिकता वाढते. प्रेसमड, कोंबडीखत आणि पाचटा पासून तयार झालेल्या खताचा वापर करावा.
हंगामानूसार पिकांची फेरपालट करावी. फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश करावा.