Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : कृषी क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक

Agriculture Sector : आजच्या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये कृषी क्षेत्रासमोर असणारी आव्हाने बदलत आहेत. वैश्‍विक तापमानामध्ये वाढ होत आहे.

Team Agrowon

Satara News : आजच्या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये कृषी क्षेत्रासमोर असणारी आव्हाने बदलत आहेत. वैश्‍विक तापमानामध्ये वाढ होत आहे. हवामान व ऋतुचक्रामध्ये सातत्याने बदल होत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये शेतीमधील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सेन्सर्स, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम यांसारख्या काटेकोर शेतीमधील अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी पाटील यांनी केले.

कऱ्हाड येथील शासकीय कृषी महाविद्यालयामध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय कृषी शिक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहायक कुलसचिव डॉ. सुनील अडांगळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. ज्योती वाळके, शैक्षणिक प्रभारी डॉ. रामचंद्र हसुरे, मुख्य समुपदेशक डॉ. संपत कोळपे आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, की देशातील साठ टक्के लोकसंख्या शेतीवर विसंबून आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा अठरा टक्के वाटा आहे. या सर्व बाबींचा विचार करता कृषी क्षेत्र हे विकासात एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे दिसून येते. डॉ. ज्योती वाळके यांनी प्रास्ताविक, डॉ. अर्चना ताठे यांनी सूत्रसंचालन व डॉ. सुनील अडांगळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या निकषात बदल, आणखी २३ लाख शेतकऱ्यांना लाभ, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Lasalgaon APMC Market: सभापती, उपसभापती निवड ऐनवेळी रद्द

Banana Crop Damage: पाऊस, वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान

Bajra Sowing: खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच; क्षेत्र स्थिर राहण्याचे संकेत

Eknath Shinde: ते देशात अराजकता पसरवण्याचे काम करताहेत, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT