Infestation of humani Agrowon
ॲग्रो विशेष

Humani Pest Issue : तुरीच्या पिकाचे हुमणीमुळे नुकसान

Crop Damage : नगर जिल्ह्यासह राज्यातील काही भागांत तूर पिकात हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे झाडे जागेवर वाळू लागली आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : नगर जिल्ह्यासह राज्यातील काही भागांत तूर पिकात हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे झाडे जागेवर वाळू लागली आहेत. पुढील काळात प्रादुर्भाव वाढल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शेतकऱ्यांना भीती वाटत आहे.

राज्यात तुरीचे सरासरी १२ लाख ९५ हजार ५१६ सरासरी हेक्टर क्षेत्र असून, यंदा १२ लाख २३ हजार २१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गेल्या वर्षी ११ लाख ८ हजार ११५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदाच्या पावसाच्या चांगल्या स्थितीमुळे गत वर्षीपेक्षा १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र तुरीचे वाढले आहे. नगरसह नंदुरबार, जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत तुरीचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे.

या वर्षी तूर पिकांची स्थिती चांगली असताना अलीकडच्या आठ दिवसांपासून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेडसह शेजारच्या बीड जिल्ह्यांतही काही ठिकाणी तुरीला हुमणीचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. हुमणीचा प्रादुर्भाव झालेल्या भागातील झाडे जागेवर सुकून जात आहेत. असे झाड उपटून पाहिल्यानंतर मातीत असलेली हुमणी दिसून येते.

खास करून शेणखताचा वापर केलेल्या ठिकाणी प्रादुर्भाव इतर ठिकाणच्या तुलनेत अधिक आहे. तुरीला हुमणीच्या प्रादुर्भावाची तीव्रता अद्याप फारशी नाही. तुरीची सध्या जोमात वाढ होत असून फुले लागायला सुरुवात झाली आहे. मात्र वेळीच नियंत्रण केले नाही तर प्रादुर्भावात वाढ होऊन तुरीचे नुकसान वाढू शकते अशी भीती शेतकऱ्यांना आहे. यंदा तुरीचे पीक जोमात असताना हे नवे संकट उभे राहते की काय याची चिंता लागली आहे.

हुमणीचा प्रादुर्भाव होत असल्याचे वेळीच लक्षात आल्यास त्यावर तातडीने नियंत्रण करता येते. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक कीटकनाशकाची आळवणी करावी.
डॉ. चांगदेव वायाळ, कृषिशास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ
आमच्या शेतात काही दिवसापासून तुरीत हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे नुकसान होत आहे. पीक जागेवरच सुकून जात आहे. त्यामुळे यंदा मोठा आर्थिक फटका बसतो की काय अशी चिंता लागली आहे.
नानाभाऊ काळोखे, शेतकरी, रुईखेल, ता. श्रीगोंदा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT