Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Supply : अकोल्यात विशिष्ट कंपनीच्या बियाण्याचा पुरवठा रोखला

Seed Production : शेतकऱ्यांच्या मागणीमुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर

Team Agrowon

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेव

Cotton Seed : अमरावती ः अकोला जिल्ह्यात एका कंपनीच्या कापूस वाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याने कंपनीला उर्वरित ५० हजार पाकिटांचे वितरण थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी दिली.

अकोला जिल्ह्याच्या खारपाणपट्ट्यात एका कंपनीच्या विशिष्ट कापूस वाणाची मागणी होते. याच संधीचा फायदा घेत कंपनीकडून देखील दरवर्षी कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो, असे चित्र आहे. कंपनी मात्र हा दावा फेटाळते; जर मागणी असेल तर विक्रीऐवजी कोणाला मालाची साठवणूक करावे असे वाटेल, असे स्पष्टीकरण कंपनीस्तरावरून दिले जाते. या प्रकरणात मात्र शेतकऱ्यांची नाहक ससेहोलपट होते. या वर्षी संबंधित बियाणे कंपनीला तीन लाखांवर पाकिटांची मागणी अकोला जिल्ह्यातून करण्यात आली होती. उत्पादकता कमी झाल्याचे सांगत कंपनीकडून केवळ १ लाख २३ हजार पाकिटांचाच पुरवठा केला जाणार आहे.

त्यातील ७५ हजार पाकिटांचे वितरण आजवर करण्यात आल्याचे कंपनीने कृषी विभागाला सांगितले आहे. या ७५ हजार पाकिटांच्या विक्रीसाठी प्रति शेतकरी दोन पाकिटे असे धोरण कृषी विभागाने राबविले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील मुले, मुली, महिला असेच सर्वच कुटुंबीय बियाणे खरेदीसाठी रांगेत लागले होते. यातूनच वाद आणि हाणामारी देखील झाली. परिणामी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने आता कंपनीने जिल्ह्यातील बियाणे वितरण थांबविण्याची सूचना कृषी विभागाने केली आहे. परिस्थिती निवळत नाही तोवर उर्वरित ५० हजार पाकिटांचा पुरवठा अकोला जिल्ह्यात करू नये, असे स्पष्ट निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी दिली.


विशिष्ट कंपनीच्या वाणाऐवजी इतरही दर्जेदार वाण बाजारात आहेत. त्याचा आग्रह शेतकऱ्यांनी केला पाहिजे. एकाच वाणासाठी आग्रही असल्याने अशा वाणाचा काळाबाजार होतो. अधिक दरात असे वाण खरेदी करावे लागते. परिणामी उत्पादकता खर्च वाढतो. हंगामाअखेरीस अपेक्षित उत्पादकता झाली नाही तर हे बियाणे महाग ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भूलथापांना बळी न पडता इतर वाणांचा पर्याय विचारात घेतला पाहिजे.
- किसन मुळे,
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT