Soybean Seed Supply : ‘महाबीज’कडून ६० हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा पुरवठा

Soybean Seed Update : सोयाबीनच्या ६० हजार ६३ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे, अशी माहिती ‘महाबीज’चे विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.
Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon

Parbhani Soybean News : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांच्या मिळून ६२ हजार ५६९ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आहे.

त्यात सोयाबीनच्या ६० हजार ६३ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे, अशी माहिती ‘महाबीज’चे विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.

परभणी विभागातील ६ जिल्ह्यांसाठी यंदा मंजूर खरीप पिकांच्या बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यात सोयाबीनचे ६० हजार ६३ क्विंटल, तुरीचे १ हजार ३० क्विंटल, मुगाचे २२४ क्विंटल, उडदाचे ९३३ क्विंटल, ज्वारीचे २२० क्विंटल, बाजरीचे ९८ क्विंटल बियाणे आहे.

विविध पिकांचे मिळून परभणी जिल्ह्यामध्ये ७ हजार २९३ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यामध्ये ३ हजार ७३७ क्विंटल, नांदेड जिल्ह्यामध्ये १३ हजार ४१९ क्विंटल, लातूर जिल्ह्यामध्ये २२ हजार ४०५ क्विंटल, धाराशिव जिल्ह्यामध्ये १३ हजार २९ क्विंटल, सोलापूर जिल्ह्यात २ हजार ६८६ क्विंटल बियाणे पुरवठा करण्यात आला.

Soybean Seeds
Soybean Market : अकोल्यात सोयाबीनची आवक वाढतीच

सोयाबीन बियाण्यामध्ये १० वर्षाखालील (एमएयूएस ६१२, एमएयुएस १६२, एमएसीएस १२८१, एमएसीएस ११८८, फुले किमया, फुले संगम, एएमएस १००१, पीडिकेव्ही अंबा) वाणांचे २८ हजार ७९५ क्विंटल बियाणे, ११ ते १५ वर्षे मधील (एमएयूएस १५८) वाणांचे ५ हजार २४८ क्विंटल, १५ वर्षावरील वाणांचे २६ हजार १८ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

यंदासाठी महाबीजने सोयाबीनच्या नवीन वाणांच्या बियाण्याचे किरकोळ विक्री दर प्रतिकिलो १०० रुपये एवढे तर जे. एस. ३३५ वाणाचे बियाण्याचे दर प्रतिकिलो ९१ रुपये एवढे निश्चित केले आहेत.

महाबीजची जिल्हानिहाय बियाणे पुरवठा स्थिती (क्विंटलमध्ये)

जिल्हा - सोयाबीन- तूर- मूग - उडीद- ज्वारी- बाजरी

परभणी -७१५८ - ७६ - ४९ -८ - ०० - २

हिंगोली - ३६२८- ५६ - १४ - १७- ६- १६

नांदेड - १३१०१- १११- ५२- ६० - ९५- ००

लातूर - २२०५६- १९४- २४- ४४- ८६- १

धाराशिव १२१९७ - ३१८- ४४ - ४४५ - ९- १६

सोलापूर - १९२३ -२७५- ४१- ३६०- २४ -६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com