Highway Touch Home Agrowon
ॲग्रो विशेष

Land Dispute : कहाणी ‘हायवे टच’ घराची!

Highway Touch House Story : आजची गोष्ट ही अशाच एका कुटुंबाची आहे ज्यांनी मोठ्या शहराच्या जवळ असलेल्या त्यांच्या गावातील गावठाणात असलेले जुने घर पाडून शेतजमिनीच्या जवळ आणि हायवे शेजारी घर बांधायला घेतले.

शेखर गायकवाड

Home Story : जगभरामध्ये आपले राहते घर हे प्रचंड वाहतूक असलेल्या हायवेवर किंवा हायवे शेजारी कधीच बांधले जात नाही. मात्र आपल्याकडे लोक अभिमानाने ‘माझे ‘हायवे टच’ घर आहे’ असे सांगतात. आजची गोष्ट ही अशाच एका कुटुंबाची आहे ज्यांनी मोठ्या शहराच्या जवळ असलेल्या त्यांच्या गावातील गावठाणात असलेले जुने घर पाडून शेतजमिनीच्या जवळ आणि हायवे शेजारी घर बांधायला घेतले.

थोरला दयानंद आणि धाकटा जयप्रकाश या दोन्ही भावांनी शेजारी शेजारी हायवेच्या जवळ बंगले बांधायला घेतले. दोन्ही भावांना प्रत्येकी १० एकर जमीन व त्यातील रस्त्याच्या समोर दोन्ही मुलांच्या वाटण्या असल्या तरी घर बांधताना मात्र त्यांनी हायवेच्या शेजारी घर बांधण्याचा प्रयत्न केला. शिवाय घराचा पाया खणताना सुद्धा बंगल्याच्या समोर सहा फूट रुंदीचा पाया हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हणजेच सरकारच्या मालकीच्या जागेत येईल, असा त्यांनी प्रयत्न केला.

सार्वजनिक बांधकाम खात्याने ३०-४० वर्षांपूर्वी भूसंपादन केले असले, तरी डांबरीकरणाचा भाग सोडून २०-२५ फुटांची पट्टी रस्त्याशेजारी तशीच पडून होती. अर्थातच ती सरकारी मालकीची जमीन होती. त्यामध्ये या दोन्ही भावांच्या बंगल्याच्या पायाचा भाग खोदला गेला. एवढेच नाही तर बंगल्याचे तोंड सुद्धा हायवेच्या बाजूने घेतल्यामुळे हायवेवरून खाली उतरले की लगेचच घर लागत असे. अतिशय थाटामाटात त्यांनी दोन्ही बंगल्याची वास्तुशांती एकाच दिवशी ठेवली.

वास्तुशांतीच्या दिवशी आलेल्या शेकडो पाहुण्यांना आपली वाहने वळवताना रस्त्यावरून प्रत्येकाला ५-१० मिनिटे वेळ लागला आणि प्रत्येक जण ‘एवढ्या शेजारी हायवेला लागून कशासाठी घर बांधले आहे?’ हे त्यांना विचारत होते. त्यांचे एक जवळचे नातेवाईक सखाराम हे हायवे वरून घराकडे वळताना त्यांच्या मोटारसायकलला एका ट्रॅक्टरने धडक दिली आणि ते अक्षरशः मरता मरता वाचले. ६-७ फूट शेत जमीन वाचविण्यासाठी सरकारी जागेत घर बांधण्याचा प्रयास या दोन्ही भावांनी केला होता.

वास्तुशांतीनंतर आणखी एक समस्या निर्माण झाली. त्यांच्या दोघांच्याही घरातील लहान मुले खेळायला रस्त्यावर जायला लागली आणि वाहनांच्या प्रचंड वेगामुळे अजून एक भीती त्यांच्या मनामध्ये बसली. लहान मुले खेळण्यासाठी न सांगता अनेक वेळा रस्त्यावर जातील याचा कसलाही भरवसा नसल्यामुळे दोघांच्याही मुलांवर आपत्ती येऊ शकते असे त्यांना वाटले.

वास्तुशांती झाल्यावर आठ दिवसांच्या आत बंगल्याच्या पाठीमागचे दरवाजे त्यांना घराचे प्रवेशद्वार करावे लागले आणि रस्त्याच्या बाजूचे मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम करून बुजवून टाकावे लागले. आता त्यांच्या शेतातील आणखी काही जमिनीमध्ये या दोन्ही बंगल्यांचे अंगण झाले आणि काही दिवसांपुरता प्रश्‍न सुटला. दोन वर्षांतच या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा सरकारने निर्णय घेतला आणि असे करताना सर्वप्रथम सरकारी जागेत बांधण्यात आलेली सर्व अतिक्रमणे पाडण्याचा पण निर्णय झाला.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही भावांच्या बंगल्यामधील रस्त्याशेजारी बांधलेल्या बेडरूम खोल्या जेसीबीने पाडून टाकल्या आणि नवीन बांधलेल्या बंगल्यांना खिंडार पाडले. नव्या वास्तू असताना सुद्धा व त्या घरांना ७०-८० वर्षे आता बघावे लागणार नाही असे वाटत असताना दोन्ही बंगल्यांची खिंडारे झाली होती. बांधकाम खात्याचे ठरवून दिलेल्या रेषेप्रमाणे नव्याने भिंती उभाराव्या लागल्या. त्यामध्ये पण एक गंमत झाली.

बंगल्यामधील दोन्ही बेडरूम पाडण्यात आल्या व फक्त किचन उरले होते. या वास्तूत राहायचे की नाही असा प्रश्‍न दयानंद व जयप्रकाश यांच्यासमोर निर्माण झाला. माणसांची फक्त पायापुरते पाहायची म्हणजे प्रश्‍न निर्माण झाला की त्यावर इलाज शोधायची सवय कशी अंगलट येते, हे त्याचे द्योतक आहे! निदान पुढील काही बाबींचा वेध घेऊन धोरण आखले तरच अशा प्रश्नांवर लोकांना मात करता येऊ शकेल.

शिवाय बांधलेल्या घराचा जो भाग पाडण्यात आला तो पूर्णपणे अतिक्रमणामध्ये असल्यामुळे त्याचा कसलाही मोबदला या दोन्ही भावांना मिळू शकला नाही. केवळ स्वार्थामुळे मोठा आर्थिक फटका त्यांना बसला होता. सहा फुटांची जागा वाचविण्यासाठी केलेला हा प्रपंच बघता बघता त्यांच्या अंगलट आला होता. बंगले बांधण्यापूवी अनेक मित्रांनी दिलेला सल्ला दोन्ही भावांनी अक्षरशः दुर्लक्षिला होता आणि दोन वर्षांतच पश्‍चात्तापाची त्यांच्यावर पाळी आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT