Land Dispute : जुनी खरेदी; परंतु मालकच सापडेना

Article by Shekar Gaikwad : लालाशेठ नावाच्या एका शेठजीकडून १९७० मध्ये खरेदी केलेल्या एक एकर जमिनीचे खरेदीखत पुंडलिकरावला २०२२ मध्ये घरातील एका अडगळीच्या पेटीमध्ये सापडले.
Land Issue
Land IssueAgrowon

Land Issue : लालाशेठ नावाच्या एका शेठजीकडून १९७० मध्ये खरेदी केलेल्या एक एकर जमिनीचे खरेदीखत पुंडलिकरावला २०२२ मध्ये घरातील एका अडगळीच्या पेटीमध्ये सापडले. तेव्हापासून ही जमीन आपल्याला कशी मिळू शकेल, याचा शोध त्याने सुरू केला होता. जुनी कागदपत्रे शोधून काढली असता सुरुवातीला ही जमीन पुंडलिकच्या आजोबाचीच होती. परंतु १९३० मध्ये ही जमीन शंभर रुपये कर्जापोटी लालाशेठकडे गहाण ठेवल्याचे त्याच्या लक्षात आले.

त्या काळी शंभर रुपये ही सुद्धा किंमत फार जास्त होती. परंतु आज पुंडलिकला हे कळेना शंभर रुपयांसाठी जमीन गहाण ठेवायचे कारण काय? आजूबाजूची सगळी जुनी माणसे आता फार वयोवृद्ध झाली होती आणि कोणालाही दस्तऐवजाबद्दल काही सांगता येईना.

Land Issue
Land Dispute : स्थानिक पुढाऱ्याची हुशारी

मग पुंडलिकरावने ही जमीन किती वर्षांपर्यंत गहाण होती याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्याच्या ही बाब लक्षात आली, की १९३० पासून १९६९ पर्यंत या जमिनीला कब्जेदार सदरी लालाशेठ याचे नाव होते. जुन्या सातबाराच्या इतर हक्कांमध्ये पुंडलिकच्या आजोबाचे नाव होते. ‘ताबेगहाणाने लालाशेठ’ असा शेरा सातबारावर इतर हक्कामध्ये होता.

तेव्हापासून आज अखेर या मिळकतीच्या सातबारावर लालाशेठचेच नाव होते. रजिस्टर झालेले खरेदीखत पेटीमध्ये सापडले तरी आज त्याचा उपयोग होईल का, अशी त्याच्या मनामध्ये शंका होती. कारण ते खरेदीखत वडिलांनी गेल्या साठ वर्षांत का नोंदवले नाही, हे कळायला मार्ग नव्हता.

आजचा सातबारा काढून पाहिला असता आजही जमिनीला लालाशेठचे नाव होते. मग पुंडलिकने ही जमीन प्रत्यक्षात कोठे आहे याचा शोध सुरू केला, तेव्हा डोंगराच्या कडेला जिथे सगळी झाडी वाढली होती अशा जमिनीच्या सातबारावर आजही लालाशेठचेच नाव आहे असे त्याच्या लक्षात आले.

ही जमीन मुरमाड होती आणि त्यावर असंख्य झाडे वाढली होती. परंतु ही जमीन कोणी कसत नव्हते. पुंडलिकचा उत्साह थोडा अजून वाढला. आणखी कोणाशी तरी भांडण्याची वेळ तरी येणार नाही, असे त्याच्या मनात आले. त्यानंतर ७० वर्षे जुन्या झालेल्या, पण रजिस्टर खरेदीखताचा काही उपयोग होईल का? याचा शोध पुंडलिकने सुरू केला व गावातील तलाठी भाऊसाहेब, सर्कल भाऊसाहेब यांच्याशी चर्चा केली.

Land Issue
Land Dispute : चुकीच्या सल्ल्याने होते फसगत

सुरुवातीला सत्तर वर्षे जुन्या कागदाचा आता काही उपयोग नाही, असे त्याला सांगितले गेले. वकिलाने मात्र त्याला आजही जर लालाशेठचे नाव सातबारावर असेल तर आपल्याला सरळ नोंदीसाठी हे खरेदीखत तलाठ्याकडे देता येईल असे सांगितले. पण त्याचबरोबर आज लालाशेठच्या घरातले कोणी वारस आहेत का? याची पण चौकशी करायला सांगितले.

त्यानंतर एक महिनाभर पुंडलिक सगळीकडे लालाशेठची चौकशी करू लागला. जुन्या माणसांनी त्याला हे सांगितले, की आम्ही गावात असल्यापासून कधीही या लालाशेठ नावाच्या माणसाला पाहिलेले नाही. त्यानंतर लालाशेठच्या नातेवाइकांना शोधण्याचे त्याने ठरवले. जिल्हा पातळीवर लालाशेठचे लांबचे नातेवाईक त्यांना भेटले.

त्याने सांगितले की लालाशेठ जाऊन फार वर्षे झाली. त्याला मूलबाळ नव्हते. त्याला वारस कोणी नाही. त्यामुळे नियमानुसार तुम्हाला जे करता येत असेल ते तुम्ही करा, असा सल्ला लालाशेठच्या नातेवाइकांनी त्यांना दिला.

पुंडलिकच्या पुढचा प्रश्‍न सुटला नव्हता तर तो अधिकच गहन झाला होता. वकिलांनी त्याला सांगितले, की लालाशेठला कोणी वारस नाही, हे सुद्धा आपल्याला दिवाणी कोर्टात जाऊन सिद्ध करावे लागेल व त्याच्यात किती वेळ लागेल मला सांगता येत नाही. बहुतेक असाच प्रयत्न कुंडलीच्या वडिलांनी पण पूर्वी केलेला असावा आणि कंटाळून हा कागद पेटीत ठेवून दिला असावा, असे पुंडलिकला आता वाटू लागले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com