Pune News: राज्यभरात तांत्रिक अडचणींमुळे ई-पीक पाहणीचे ‘तीन तेरा’ झाले आहेत. खरीप हंगामात राज्यात आतापर्यंत सुमारे १४२ लाख हेक्टरवर पेरा झाला. परंतु एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी केवळ ७ टक्के क्षेत्रावरील पिकांचीच नोंद करता आली. ई-पीक पाहणीसाठी१५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे उरलेल्या दिवसांत सर्व शेतकऱ्यांची नोंद पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. .सरकारने पीकविमा, नुकसान मदत, हमीभावाने खरेदी, पीककर्ज आणि कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक केली आहे. राज्यात १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीला सुरुवात झाली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे २२ दिवसांमध्ये खरिपातील केवळ ७ टक्के क्षेत्राचीच ई-पीक पाहणी झाली. आणखी १३१ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद व्हायची आहे. सर्व्हर चालत नसल्याने अनेकदा प्रयत्न करूनही ई-पीक पाहणी पूर्ण होत नाही. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहेत..e pik Pahani: ई पीक पाहणीत सर्व्हरचा खोडा; ७ टक्केच पाहणी पूर्ण.सरकारने उन्हाळी हंगामापासून ई-पीक पाहणीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे ,अर्थात डीसीएस मोबाईल अॅप दिले आहे. परंतु हे अॅप व्यवस्थित चालत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र सर्व तांत्रिक अडचणी सोडवल्या असून १५ सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण होईल, असा दावा ई-पीक पाहणी प्रकल्पाकडून करण्यात आला..E Pik Pahani: ई-पीक पाहणी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना अडचणी.शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीप्रशासनाने सांगितल्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी अपडेटेड अॅप डाउनलोड करूनही सर्व्हर कनेक्ट होत नसल्याचा मेसेज येत आहे.ई-पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करताना संपूर्ण माहिती भरावी लागते. मात्र माहिती सेव्ह करण्याचा प्रयत्न केला तर होत नाही आणि पूर्ण प्रक्रिया पुन्हा सुरुवातीपासून करावी लागते. हेच प्रकार वारंवार घडत आहेत.पिकाचा फोटो काढताना शेताच्या मध्यभागी असूनही शेतापासून दूर असल्याचे दाखवते.काही शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी पूर्ण झाली. परंतु काही शेतकऱ्यांनी १५ दिवस होऊनही सातबारावर पिकाची नोंद झाली नसल्याचे सांगितले..ई-पीक पाहणी ॲपमधील सर्व समस्या सोडविण्यात आल्या असून तांत्रिक तक्रारी जशा येतील तशा त्या सोडवल्या जात आहेत. मात्र नुकताच पाऊस उघडल्याने शेतकरी एकाच वेळी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेही लोड येत आहे. काही भागात समस्या आहेत, त्या सोडवल्या जातील. राज्यातील १०० टक्के ई-पीक पाहणी १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल.सरिता नरके, राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी प्रकल्प.मी १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करत आहे. आजपर्यंत सर्व्हरच्या समस्येमुळे ती पूर्ण झाली नाही. सरकार म्हणते रात्री चांगली रेंज मिळते तेव्हा नोंदणी करा. माझ्या घरी जिओचे फायबर आहे. तरीही सर्व्हर चालत नाही. अर्धी माहिती भरली आणि समस्या आली की दुसऱ्या वेळी पुन्हा सुरुवातीपासून माहिती भरावी लागते. आमच्या भागातील जवळपास सगळ्या शेतकऱ्यांची हीच समस्या आहे. अशोक पवार, शेतकरी, उमरगा, जि. धाराशिव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.